Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 6:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली; आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व यहूदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ही गोष्ट सर्व लोकांस पसंत पडली. आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरूष स्तेफन, आणि फिलीप्प, प्रखर, नीकलाव तीमोन, पार्मिना व यहूदी मतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 हा विचार सर्व लोकांना पसंत पडला आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असलेल्या स्तेफनबरोबर फिलिप, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व अंत्युखिया येथील यहुदीमतानुसारी नीकलाव ह्यांची निवड केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 गटातील सर्वांस हा प्रस्ताव योग्य वाटला. त्यांनी स्तेफनाची निवड केली, जो विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता; फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पर्मिना व नीकलाव हा अंत्युखियाचा असून यहूदी मतानुसार त्याचे परिवर्तन झालेले होते

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 6:5
24 Iomraidhean Croise  

हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले.


मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.


मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो; समयोचित बोल किती उत्तम!


मी तर याकोबाला त्याचा अपराध आणि इस्राएलास त्याचे पाप दाखवण्यास खरोखर परमेश्वराच्या आत्म्याने, सामर्थ्याने, न्यायाने व बळाने पूर्ण आहे.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही एक मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणांहून दुप्पट असा नरकपुत्र करता.


स्तेफनावरून उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून यहूद्यांना मात्र देवाचे वचन सांगत असत.


तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री व कुरेनेकर होते; ते अंत्युखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांनाही सांगू लागले.


त्यांच्याविषयीचे वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठवले.


तो चांगला मनुष्य होता, आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले.


त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियास आणले. मग असे झाले की, त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळूनमिसळून बर्‍याच लोकांना शिकवले; आणि शिष्यांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा अंत्युखियात मिळाले.


त्या दिवसांत यरुशलेमेहून अंत्युखियास संदेष्टे आले.


अंत्युखियाच्या मंडळीत बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते.


तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणांतून निवडलेली माणसे, म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बसर्र्ब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले;


तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.


मग दुसर्‍या दिवशी [पौल व त्याचे सोबती] आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो; हा सातांपैकी एक होता.


तुझा रक्तसाक्षी1 स्तेफन ह्याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवत होतो आणि त्याचा घात करणार्‍याची वस्त्रे सांभाळत होतो.’


पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना.


तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू;


स्तेफन कृपा1 व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुते व चिन्हे करत असे.


प्रमुख याजक म्हणाला, “ह्या गोष्टी अशाच आहेत काय?”


तसेच निकलाइतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्याजवळ आहेत, त्याचा मी द्वेष करतो.


तरीपण तुझ्यात एक आहे की, तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस; मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan