Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मग त्याने आलेल्या किंमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मग त्याने त्या किंमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने ठेवून घेतला, आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 परंतु हनन्याने आलेल्या किमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने स्वतःसाठी राखून ठेवला व उरलेला भाग आणून प्रेषितांकडे दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मिळालेल्या पैशातून काही पैसे त्याने त्याच्या पत्नीच्या पूर्ण संमतीने स्वतःसाठी ठेवले व बाकीचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणी ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 5:2
16 Iomraidhean Croise  

आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करतो; असा फसवणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रांत माझ्या नावाची भीती धरतात, असे परमेश्वर म्हणतो.


आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात;


त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही; तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो तसे म्हणाला.


तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही समाईक होते.


ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणी ठेवले.


हनन्या नावाचा कोणीएक इसम व त्याची बायको सप्पीरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली.


तेव्हा पेत्र म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे?


पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय?” तिने उत्तर दिले, “होय, एवढ्यालाच.”


तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना.


कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वत:स पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan