Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि अविश्वासी लोकांतला कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नसे; तरी लोक त्यांना थोर मानीत असत,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे. मात्र लोक त्यांना थोर मानत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात अत्यंत सन्मान होता, परंतु त्यांच्यात सामील होण्याचे धैर्य कोणाला झाले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 5:13
19 Iomraidhean Croise  

तेव्हा ती एलीयाला म्हणाली, “हे देवाच्या माणसा, तुमचा माझा काय संबंध? माझ्या पातकांचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलाला मारून टाकावे म्हणून तुम्ही माझ्या घरी आला आहात का?”


सीयोनेतील पातकी घाबरले आहेत. अधर्म्यांना कापरे भरले आहे. “भस्म करणार्‍या अग्नीसमीप आमच्यातला कोण राहील? सर्वकाळ पेटत राहणार्‍या अग्नीसमीप आमच्यातला कोण टिकेल?”


तरी काय करावे हे त्यांना सुचेना; कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.


असे असूनही अधिकार्‍यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभाबहिष्कृत होऊ नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करत नव्हते;


त्यानंतर अरिमथाईकर योसेफ ह्याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून यहूद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता; आणि पिलाताने परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर नेले.


त्याच्या आईबापांना यहूद्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभाबहिष्कृत करावे असे यहूद्यांचे अगोदरच एकमत झाले होते.


मग इफिसात राहणारे यहूदी व हेल्लेणी ह्या सर्वांना हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला.


सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे.


तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले; त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना; कारण घडलेल्या गोष्टींमुळे सर्व लोक देवाचा गौरव करत होते.


तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले; कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते.


हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणार्‍या सर्वांना मोठे भय वाटले.


आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसर्‍यांच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिरवत नाही; तर तुमचा विश्वास वाढत जाईल तसतसे आमच्या मर्यादेचे क्षेत्र तुमच्यामध्ये अधिकाधिक वाढत जाईल अशी आम्हांला आशा आहे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan