Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 4:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्णबा (म्हणजे बोधपुत्र) म्हणत. त्याची शेतजमीन होती;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 आणि कुप्र बेटाचा रहिवासी लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्णबा, म्हणजे उत्तेजन पुत्र असे नाव दिले होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

36 कुप्र बेटावर जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. प्रेषित त्याला बर्णबा म्हणजे उत्तेजनपुत्र म्हणत. त्याची शेतजमीन होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 योसेफ लेवी असून सायप्रसवासी होता ज्याला प्रेषितांनी बर्णबा म्हणजे, “उत्तेजनाचा पुत्र” असे नाव दिले होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 4:36
24 Iomraidhean Croise  

जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले;


त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे ते बर्णबा व शौल ह्यांच्या हाती वडीलवर्गाकडे1 पाठवून दिले.


बर्णबा व शौल हे आपली सेवा पूर्ण करून, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घेऊन यरुशलेमेहून माघारी आले.


अंत्युखियाच्या मंडळीत बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते.


तेव्हा नियमशास्त्राचे व संदेष्ट्यांच्या ग्रंथांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकार्‍यांनी त्यांना सांगून पाठवले की, “बंधुजनहो, तुमच्याजवळ लोकांकरता काही बोधवचन असेल तर सांगा.”


ते प्रभूची सेवा व उपास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.”


ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्रास गेले.


तेव्हा सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.


तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने यरुशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे.


बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे.


ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला;


आमच्याबरोबर कैसरीयातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले; त्याच्या येथे आम्ही राहणार होतो.


मग कुप्र दृष्टीस पडले तेव्हा ते डावीकडे टाकून आम्ही सूरियाकडे जाऊन सोरास उतरलो, कारण तेथे तारवातील माल उतरवायचा होता.


मग आम्ही तेथून निघाल्यावर वारा तोंडचा असल्यामुळे कुप्राच्या किनार्‍यावरून गेलो.


तेव्हा बर्णबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिष्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले हे सर्व त्याने त्यांना सांगितले.


संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्यांबाबत बोलतो.


अथवा कामधंदा केल्यावाचून उपजीविका करण्याचा हक्क मला व बर्णबाला मात्र नाही काय?


नंतर चौदा वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा यरुशलेमेस वर गेलो. मी आपल्याबरोबर तीतालाही घेतले होते.


त्याच्याबरोबर बाकीच्या यहूद्यांनीही ढोंग केले; ते इतके की बर्णबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला.


आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हांला सलाम सांगतो, आणि बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हांला सलाम सांगतो, (त्याच्याविषयी तुम्हांला आज्ञा मिळाल्या आहेत, तो तुमच्याकडे आला तर त्याचा स्वीकार करा);


Lean sinn:

Sanasan


Sanasan