Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 4:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, “देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे, हे तुम्हीच ठरवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले, “देवाच्याऐवजी तुमचे ऐकावे, हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 परंतु पेत्र व योहानाने उत्तर दिले, “परमेश्वराच्या दृष्टीने काय योग्य आहे याचा न्याय तुम्हीच करा! तुमचे ऐकावे की त्यांचे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 4:19
30 Iomraidhean Croise  

ही गोष्ट पापाला कारण झाली; दानापर्यंतचे लोक ह्यांपैकी एका वासराच्या दर्शनाला जाऊ लागले.


त्याने त्याच्याबरोबर परत जाऊन त्याच्या घरी अन्नपाणी सेवन केले.


यराबामाने जी पातके स्वत: केली व इस्राएलांकडून करवली त्यामुळे परमेश्वर इस्राएलांचा त्याग करील.”


ईजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणार्‍या वडील जनांनी व सरदारांनी केले.


मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वर जे काही मला सांगेल तेच मी बोलेन.”


आहाज राजाने उरीया याजकाला आज्ञा केली की, “नित्य सकाळचा होमबली, संध्याकाळचा अन्नबली, राजाचे होमबली व अन्नबली, आणि देशातील सगळ्या लोकांचे होमबली व पेयार्पणे ही मोठ्या वेदीवर अर्पावीत; होमबली व इतर यज्ञपशू ह्यांचे रक्त त्या वेदीवर शिंपडावे; पितळेची वेदी माझ्यासाठी शकुन पाहण्यासाठी असावी.”


आहाज राजाच्या आज्ञेप्रमाणे उरीया याजकाने केले.


अहो सत्ताधीशांनो, तुम्ही यथार्थ न्याय करता काय? तुम्ही मनुष्यामनुष्यामध्ये चोख निवाडा करता काय?


त्या सुइणी देवाचे भय बाळगणार्‍या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाच्या हुकमाप्रमाणे न करता मुलगेही जिवंत राहू दिले.


मग यिर्मया सर्व सरदारांना व सर्व लोकांना म्हणाला, “जी संदेशवचने तुम्ही ऐकली ती सर्व ह्या मंदिराविरुद्ध व ह्या नगराविरुद्ध सांगावीत म्हणून परमेश्वराने मला पाठवले.


ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही.”


ह्या फर्मानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला.


एफ्राइमाला पीडा झाली आहे, त्याच्या हक्काची पायमल्ली झाली आहे; कारण तो स्वेच्छेने शून्याच्या मागे लागला.


तर परमेश्वराचे वचन ऐक; तू म्हणतोस ‘इस्राएलाविरुद्ध संदेश सांगू नकोस, इसहाकाच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नकोस.”’


अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”


ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.”


तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले की, “आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.”


वरवर पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”


तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्‍चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले.


“ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.”


परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.


तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो; मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा.


आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करत नाही; तर सत्य प्रकट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकाला आपणांस पटवतो.


मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.


हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे.


‘मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेवले,’ कारण ते मूल ‘सुंदर आहे असे त्यांनी पाहिले;’ व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही.


तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनता की नाही?


Lean sinn:

Sanasan


Sanasan