Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्‍चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत, हे जाणून त्यांनी आश्चर्य केले, आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 पेत्राचे व योहानचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी आहेत, हे जाणून न्यायसभेच्या सदस्यांना आश्चर्य वाटले. हे येशूच्या सहवासात होते, हेही त्यांनी ओळखले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्यांनी पेत्र व योहान यांचे धैर्य पाहिले तेव्हा त्याचे त्यांना नवल वाटले आणि त्यांना कळून आले की ती अशिक्षित व सर्वसामान्य माणसे असून ते येशूंच्या सहवासात राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 4:13
22 Iomraidhean Croise  

त्या वेळी येशू असे बोलू लागला : “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या.


मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथील लोकांना म्हटले, “हा नासोरी येशूबरोबर होता.”


नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर, तूही त्यांच्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते.”


तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले की, “आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.”


मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!”


ह्यावरून यहूदी आश्‍चर्य करून म्हणू लागले, “शिकल्यावाचून ह्याला विद्या कशी आली?”


पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.”


तरी बर्‍या झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काही विरुद्ध बोलता येईना.


परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, “देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा;


तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा;


त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.


तेव्हा बर्णबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिष्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले हे सर्व त्याने त्यांना सांगितले.


तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे;


तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले;


त्याच्या अंत:करणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात; आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करील व ‘तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे’ असे बोलून दाखवील.


तर मग आम्हांला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो;


Lean sinn:

Sanasan


Sanasan