प्रेषित 3:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहात, आणि ‘तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील’ असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तुम्ही संदेष्ट्याचे मुले आहात आणि तुझ्या संततीद्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील, असे अब्राहामाशी बोलून, ‘देवाने तुमच्या पूर्वजांशी जो करार केला त्या कराराची तुम्ही मुले आहा.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 तुम्ही संदेष्ट्यांची संतती आहात आणि देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या करारातही तुम्ही सहभागी आहात. देवाने अब्राहामला सांगितल्याप्रमाणे ‘तुझ्या संततीमधून पृथ्वीवरील सर्व लोकांना आशीर्वाद प्राप्त होईल’. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तुम्ही संदेष्ट्यांचे वारसदार आहात आणि परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराचे भागीदार आहात. ते अब्राहामाला म्हणाले, ‘तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.’ Faic an caibideil |
कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की, “म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.”