Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला ‘सेवक’ येशू, ह्याचा गौरव केला आहे; त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्‍चय केला असताही त्याच्यासमक्ष तुम्ही त्याला नाकारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 अब्राहामाचा, इसहाकाचा, व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. त्यास तुम्ही मरणास सोपवून दिले, व पिलाताने त्यास सोडून देण्याचे ठरवले असताही त्यास तुम्ही त्याच्यासमक्ष नाकारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने त्याचा सेवक येशू ह्याचा गौरव केला आहे. मात्र तुम्ही त्याला अधिकाऱ्यांच्या हाती सोपविले. पिलातने त्याला सोडून देण्याचे ठरवले असतानाही त्याच्यासमक्ष तुम्ही येशूला नाकारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचे परमेश्वर, जे आपल्या पूर्वजांचे परमेश्वर आहेत, त्यांनी त्यांचा सेवक येशूंना गौरविले आहे. त्याच येशूंना मारून टाकले जावे यासाठी तुम्ही त्यांना धरून दिले आणि पिलातासमोर तुम्ही त्यांना नाकारले. जरी पिलाताने त्यांना सोडून देण्याचा निश्चय केला होता,

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 3:13
46 Iomraidhean Croise  

तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “पाहा, ‘मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुमच्याकडे पाठवले आहे,’ असे मी इस्राएलवंशजांकडे जाऊन त्यांना सांगितले असता ‘त्याचे नाव काय’ असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू?”


आणखी देवाने मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे; हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल.


तो आणखी म्हणाला, “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले; कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला.


माझ्या पित्याने माझ्या हाती सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.


आणि थट्टा करण्यास, फटके मारण्यास व वधस्तंभावर खिळण्यास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि तिसर्‍या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल.”


ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.’ तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे.”


आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले.


तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


परंतु त्याला सोडण्याऐवजी ‘बरब्बाला आमच्यासाठी सोडा’ अशी मागणी करण्यास मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले.


पण ते नाकारून तो बोलला, “बाई, मी त्याला ओळखत नाही.”


तेव्हा मुख्य याजकांना व लोकसमुदायांना पिलाताने म्हटले, “मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही.”


तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही; कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही; क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल;


प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या; परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले.


तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा.” बरब्बा हा एक लुटारू होता.


येशूने उत्तर दिले, “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता; म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे.”


ह्यावरून पिलात त्याला सोडवण्याची खटपट करतच राहिला; परंतु यहूदी आरडाओरड करून म्हणाले, “आपण ह्याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वत:ला राजा करतो तो कैसराला विरोध करतो.”


ह्यावरून ते ओरडले, “त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा!” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसरावाचून आम्हांला कोणी राजा नाही.”


(ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले; तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता; कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता.)


मग तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावेस; आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी;


तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करतो;


हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, “अहो इस्राएल लोकांनो, ह्याचे आश्‍चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालायला लावले आहे असे समजून आमच्याकडे निरखून का पाहता?


देवाने आपल्या ‘सेवकाला’ उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, ह्यासाठी की, त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.”


कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले;


आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर; तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर.”


‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव आहे.’ तेव्हा मोशे थरथर कापला व त्याला तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.


महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे; आमेन.


देवाच्या कृपेने प्रत्येकाकरता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला ‘देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले होते,’ तो येशू मरण सोसल्यामुळे ‘गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केलेला’ असा आपण पाहतो.


मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


आणि ‘विश्वसनीय साक्षी,’ मेलेल्यांमधून ‘प्रथम जन्मलेला’ व ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती’ येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकांतून मुक्त केले,’


Lean sinn:

Sanasan


Sanasan