Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्‍चर्य व विस्मय वाटला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि जो भवनाच्या सुंदर दाराजवळ भीक मागण्यासाठी बसत असे; तो हाच आहे असे त्यांनी त्यास ओळखले तेव्हा त्यास जे झाले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच, हे त्यांनी ओळखले, तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडले त्यावरून सर्वांना फार आश्चर्य व विस्मय वाटला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि जो मंदिराच्या सुंदर नावे दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे, तो हाच आहे अशी त्यांची ओळख पटली. त्याच्या बाबतीत जे काही घडले होते, त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 3:10
12 Iomraidhean Croise  

आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले;


तेव्हा सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात!”


देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले. येशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्‍चर्य करत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,


कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्हांला आश्‍चर्य वाटावे म्हणून तो ह्यांहून मोठी कामे त्याला दाखवील.


येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला.


ह्यावरून शेजारीपाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, “भीक मागत बसणारा तो हाच नाही काय?”


तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, “हे काय असेल?”


ते सर्व आश्‍चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना?


तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणीएक माणूस होता; त्याला मंदिरात जाणार्‍यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan