Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 28:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ते जिवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर1 लोक एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस घातकी आहे; हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे, समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्यायदेवताही याला जगू देत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तो साप त्याच्या हाताला लटकलेला पाहून तेथील रहिवासी एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस खुनी आहे, हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्या बेटावरील लोकांनी त्या सर्पाला त्याच्या हाताला झोंबलेले पाहिले, तेव्हा ते एकमेकास म्हणाले, “हा मनुष्य खात्रीने खुनी असला पाहिजे; तो जरी समुद्रातून वाचला, तरी न्याय देवी त्याला जगू देणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 28:4
20 Iomraidhean Croise  

परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांला सांगितले हे खरे काय?”


रक्तपाताच्या दोषाचा ज्याला भार झाला आहे. तो शवगर्तेकडे धावतो; त्याला धरू नकोस.


कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रकट करील, वधलेल्यांना ती ह्यापुढे झाकून ठेवणार नाही.


वनपशू, कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील; कारण मी आपल्या लोकांना, आपल्या निवडलेल्यांना, पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार;


हीच ती उल्लासी, निर्धास्त असलेली नगरी! ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही; ती कशी ओसाड, पशू बसण्याची जागा झाली आहे! तिच्याजवळून जाणारा प्रत्येक जण तिची छीथू करील व तिच्याकडे हातवारे करील.


ह्यासाठी की, नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले तो बरख्याचा पुत्र जखर्‍या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्याचा दोष तुमच्यावर यावा.


सर्व लोकांनी उत्तर दिले की, “त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो.”


मग येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ह्या गालीलकरांनी असे दुःख भोगले ह्यावरून बाकीच्या सर्व गालीलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हांला वाटते काय?


किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणार्‍या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय?


वरवर पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”


तेथील बर्बर1 लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले; म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला.


तेव्हा पौलाने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला.


त्याने तर ते जिवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली नाही.


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan