Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 28:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेथील बर्बर1 लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले; म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेथील रहिवाश्यांनी आम्हास अतिशय ममतेने वागविले, त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले, कारण पाऊस पडू लागाला होता व थंडीही होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तेथील लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले, म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्या बेटावरील लोकांनी आम्हाला असाधारण दया दाखविली. त्यांनी आमच्यासाठी शेकोटी पेटवून आमचे स्वागत केले कारण पाऊस असून थंडी पडली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 28:2
19 Iomraidhean Croise  

मग यहूदा व बन्यामीन ह्यांतील सर्व लोक तीन दिवसांच्या आत यरुशलेमेत एकत्र झाले; हे सर्व नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी घडले. सर्व लोक देवाच्या मंदिराच्या चौकात सदरील कारणास्तव आणि पावसाच्या झडीमुळे थरथर कापत बसून राहिले.


सूड उगवू नकोस किंवा आपल्या भाऊबंदांपैकी कोणाचा दावा धरू नकोस, तर तू आपल्या शेजार्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर; मी परमेश्वर आहे.


तुमच्याबरोबर राहणार्‍या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वत:सारखी प्रीती करा; कारण तुम्हीही मिसर देशात परदेशीय होता; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


आणि ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचीत सांगतो.”


थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते; आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता.


दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोनास पोहचलो, तेव्हा यूल्याने पौलाबरोबर सौजन्याने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली.


तेव्हा पौलाने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला.


ते जिवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर1 लोक एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस घातकी आहे; हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही.”


हेल्लेणी व बर्बर,1 ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा मी ऋणी आहे.


जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा; पण शंकाकुशंकांचा निर्णय लावण्याकरता करू नका.


जो खातो त्याने न खाणार्‍याला तुच्छ मानू नये, आणि जो खात नाही त्याने खाणार्‍याला दोष लावू नये; कारण देवाने त्याला जवळ केले आहे.


आणि तुला शास्त्रलेख असूनही व तुझी सुंता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो शारीरिक सुंता न झालेल्यांपैकी असून नियमशास्त्र पाळतो, तो करील.


म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही, तर बोलणार्‍याला मी बर्बर असा होईन आणि बोलणारा मला बर्बर असा होईल;


श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपासतापास, थंडी व उघडेवागडेपणा, ह्या सर्वांमुळे मी अधिक आहे.


ह्यात हेल्लेणी व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही; तर ख्रिस्त सर्वकाही, आणि सर्वांत आहे.


अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका; कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan