Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 27:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 मग समुद्रात वर आलेल्या जमिनीस तारू लागल्यावर त्यांनी ते पुढे घुसवले; तेव्हा नाळ रुतून गच्च बसली आणि वराम लाटांच्या जोराने फुटून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले, तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

41 मग समुद्रात वर आलेल्या जमिनीस तारू लागल्यावर त्यांनी ते पुढे घुसविले, तेव्हा नाळ रुतून गच्च बसली आणि वराम लाटांच्या जोराने फुटून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 परंतु जहाज पुढे जाऊन वाळूत रुतून बसले. नाळ घट्ट रुतली आणि वरामाचे म्हणजे जहाजाच्या मागील भागाचे आदळणार्‍या लाटांनी तुकडे तुकडे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 27:41
11 Iomraidhean Croise  

सोने आणण्यासाठी ओफीर येथे जाता यावे म्हणून यहोशाफाटाने तार्शीशी गलबते बांधली; ती एसयोन-गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती गेली नाहीत.


तेव्हा मारेशावासी अलियेजर बिन दोदाबाहू ह्याने यहोशाफाटाविरुद्ध संदेश दिला; तो म्हणाला, “तू अहज्याशी भागी केलीस म्हणून तू केलेली कामे परमेश्वर मोडून टाकील.” ती जहाजे फुटून गेली, तार्शीशास जाऊ शकली नाहीत.


तुझ्या वल्हेकर्‍यांनी तुला खोल पाण्यात नेले, पूर्वेच्या वार्‍याने तुला भर समुद्रात मोडून टाकले.


समुद्रलहरींनी तू खोल पाण्यात फुटलीस तेव्हा तुझा माल व तुझी सर्व मंडळी तुझ्याबरोबर बुडाली.


ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्यांची योजना करून तारू खालून आवळून बांधले; आणि आपण सुर्ती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांना भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले; मग ते तसेच वाहवत गेले.


मग नांगर नाळीवरूनही टाकावे ह्या निमित्ताने खलाशी समुद्रात होडी सोडून तारवातून पळायला पाहत होते;


मग नांगर कापून टाकून त्यांनी ते समुद्रात राहू दिले, त्याच वेळेस सुकाणाची बंधने ढिली केली आणि पुढचे शीड वार्‍यावर सोडून सपाटीची वाट धरली.


तेव्हा बंदिवानांपैकी कोणी पोहून पळून जाऊ नये म्हणून त्यांना मारून टाकावे अशी शिपायांनी मसलत केली;


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2


Lean sinn:

Sanasan


Sanasan