Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 27:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोनास पोहचलो, तेव्हा यूल्याने पौलाबरोबर सौजन्याने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहचलो, युल्य पौलाशी फार चांगला वागला, पौलाच्या मित्रांना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 दुसऱ्या दिवशी आम्ही सीदोन येथे पोहचलो. तेथे यूल्य पौलाबरोबर सौजन्याने वागला. त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोन बंदरात पोहोचलो; तेव्हा यूल्याने प्रेमाने पौलाला किनार्‍यावर उतरून मित्रांकडे जाण्याची परवानगी दिली म्हणजे त्याच्या मित्रांद्वारे त्याच्या गरजा भागविल्या जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 27:3
12 Iomraidhean Croise  

कनान ह्याला सीदोन हा पहिला मुलगा आणि हेथ,


जबुलून सागरतीरी वस्ती करील; तो जहाजांचे बंदरच होऊन राहील; त्याची सरहद्द सीदोनापर्यंत जाईल.


तो म्हणाला, “हे कलंक लागलेल्या सीदोनाच्या कुमारिके, तू इतःपर उल्लासणार नाहीस; ऊठ, कित्ती लोकांच्या देशात निघून जा; तेथेही तुला थारा मिळणार नाही.”


त्याच्या सीमेवरल्या हमाथाकडे आणि सोर व सीदोन ह्यांच्याकडेही ती आहे; कारण ती फार शहाणी आहेत.


“हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्‍चात्ताप केला असता.


हेरोद सोरकरांवर व सीदोनकरांवर रागावला होता; म्हणून ते एकमताने त्याच्याकडे आले; व राजाच्या रंगमहालावरील अधिकारी ब्लस्त ह्याला अनुकूल करून घेऊन, त्यांनी समेट करण्याची विनंती केली, कारण त्या राजाच्या देशावर त्यांच्या देशाचे पोषण होत असे.


आणि त्याने शताधिपतीला हुकूम केला की, “ह्याला पहार्‍यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी.”


नंतर आम्ही इटली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसर्‍या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा यूल्य नावाचा शताधिपती ह्याच्या स्वाधीन करण्यात आले.


तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने शताधिपती त्यांच्या बेतास आडवा आला; आणि त्याने हुकूम दिला की, ‘ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनार्‍यास जावे,


आम्ही रोम शहरात गेल्यावर [शताधिपतीने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण] पौलाला त्याच्यावर पहारा करणार्‍या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.


तेथून ती एब्रोन, रहोब, हम्मोन व काना ह्यावरून जाऊन मोठे सीदोन येथपर्यंत जाते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan