Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 27:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा आम्ही आशिया प्रांताच्या किनार्‍यावरील बंदरे करणार्‍या अद्रमुत्तीय नगराच्या एका तारवात बसून निघालो; तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीकाचा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 अद्रमुत्तिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो, हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते, आम्ही या जहाजातून प्रवासास निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 आम्ही आशिया प्रांताच्या किनाऱ्यावरील बंदरास जाणाऱ्या अद्रमुत्तीय नगराच्या एका तारवात बसून निघालो, तेव्हा मासेदोनियाचा थेस्सलनीकातील रहिवासी अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा आशियाच्या प्रांतातील किनार्‍यावरील अनेक बंदरावर थांबत जाणार्‍या व अद्रमुत्तीय शहरापासून निघालेल्या जहाजात बसून आम्ही समुद्राकडे निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथील रहिवासी अरिस्तार्ख नावाचा एक मनुष्य आमच्याबरोबर होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 27:2
17 Iomraidhean Croise  

नंतर त्या दिवसांत एकदा असे झाले की, तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे त्यांना म्हणाला; तेव्हा त्यांनी मचवा सोडला.


ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत; हे तुम्हांला तारणाचा मार्ग कळवतात.”


नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहूद्यांचे सभास्थान होते.


जादूटोणा करणार्‍यांपैकी बर्‍याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली; आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्नास हजार रुपये झाली.


इतक्यात नगरात गोंधळ उडाला; आणि पौलाचे वाटेतले सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढत ओढत ते एकजुटीने नाटकगृहात धावत गेले.


पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आसिया,


मग असे झाले की, ते दिवस संपल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो; तेव्हा स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला नगराबाहेर पोहचवले. तेथे समुद्राच्या किनार्‍यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली.


तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला आणि आम्ही हाकारून निघालो तेव्हा आमच्या गरजेचे पदार्थ त्यांनी जहाजावर भरले.


मग सुराकूस येथे वरवा करून आम्ही तीन दिवस राहिलो.


आम्ही रोम शहरात गेल्यावर [शताधिपतीने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण] पौलाला त्याच्यावर पहारा करणार्‍या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.


तेथील बर्बर1 लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले; म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला.


माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हांला सलाम सांगतो, आणि बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हांला सलाम सांगतो, (त्याच्याविषयी तुम्हांला आज्ञा मिळाल्या आहेत, तो तुमच्याकडे आला तर त्याचा स्वीकार करा);


आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला सलाम सांगतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan