Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 27:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नंतर आम्ही इटली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसर्‍या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा यूल्य नावाचा शताधिपती ह्याच्या स्वाधीन करण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरवले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले, युल्य हा अगस्तस सेनेचा एक अधिकारी होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 आम्ही इटाली देशाला तारवातून जावे असे ठरल्यावर, पौलाला व दुसऱ्या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा यूल्य नावाचा रोमन अधिकारी ह्याच्या ताब्यात देण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आम्ही इटलीस तारवातून जावे असे ठरले, तेव्हा पौल आणि इतर काही बंदिवानांना बादशाही रक्षकांच्या फलटणीतील यूल्य नावाच्या शताधिपतीच्या ताब्यात देण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 27:1
29 Iomraidhean Croise  

तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते.


परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात.


कारण मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो; अवशिष्ट क्रोधाने तू आपली कंबर बांधतोस.


मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.


मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे.


पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.


शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले.


तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”


तेव्हा कोणाएका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता.


कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा कोणीएक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता.


ते म्हणाले, “कर्नेल्य शताधिपती हा नीतिमान मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहूदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने सुचवले आहे की, आपणाला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.”


त्याला असा दृष्टान्त झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगण्यास देवाने आम्हांला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लगेच विचार केला.


तेव्हा पंत येथील अक्‍विल्ला नावाचा कोणीएक यहूदी त्याला आढळला. सर्व यहूद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता; त्यांच्याकडे तो गेला.


हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्‍चय करून म्हटले, “तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.”


तत्काळ तो शिपाई व शताधिपती ह्यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारायचे थांबवले.


हे ऐकून शताधिपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमी आहे.”


त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.”


तेव्हा पौलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, “ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा; ह्याला त्यास काही सांगायचे आहे.”


आणि त्याने शताधिपतीला हुकूम केला की, “ह्याला पहार्‍यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी.”


तेव्हा फेस्ताने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, “तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरापुढे जाशील.”


परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही असे मला कळून आले, आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठवण्याचे मी ठरवले.


तथापि शताधिपतीने पौलाच्या म्हणण्यापेक्षा तांडेल व तारवाचा धनी ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले.


तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने शताधिपती त्यांच्या बेतास आडवा आला; आणि त्याने हुकूम दिला की, ‘ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनार्‍यास जावे,


तेथे इटलीस जाणारे एक आलेक्सांद्रियाचे तारू शताधिपतीला मिळाले; त्यावर त्याने आम्हांला चढवले.


असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे असे आम्हांला समजले.


आम्ही रोम शहरात गेल्यावर [शताधिपतीने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण] पौलाला त्याच्यावर पहारा करणार्‍या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.


तुम्ही आपल्या सर्व अधिकार्‍यांना व सर्व पवित्र जनांना सलाम सांगा. इटलीचे बंधू तुम्हांला सलाम सांगतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan