Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 26:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मलाही खरोखर वाटत असे की, नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 मलाही असे वाटत असे की, नासरेथकर येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “मला वाटत होते की नासरेथकर येशूंच्या नावाविरुद्ध जितके काही शक्य होईल तितके करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 26:9
16 Iomraidhean Croise  

परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हांला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत.


तेव्हा पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचवता, हे काय? मी नुसता बंधनात पडायलाच नाही, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायलादेखील तयार आहे.”


“मी यहूदी आहे. माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले, आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.


पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देईपर्यंत मी ह्या पंथाचा पाठलाग केला.


मी विचारले, ‘प्रभूजी, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासोरी येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’


हा माणूस म्हणजे एक पीडा आहे असे आम्हांला आढळून आले आहे, आणि जगातल्या सर्व यहूदी लोकांत हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.


बंधुजनहो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकार्‍यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे.


मग पेत्र म्हणाला, “माझ्याजवळ सोनेरुपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.”


शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्यांविषयीचे फूत्कार टाकत होता.


आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन.”


मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.


आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.


कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली;


मग नगरवासी योवाशाला म्हणू लागले, “तुझ्या मुलाला बाहेर आण; त्याला मारून टाकायचे आहे, कारण त्याने बआल देवाची वेदी पाडून टाकली आहे आणि तिच्याजवळची अशेरा मूर्ती तोडून टाकली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan