Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 26:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 इस्राएली लोकांपासून व यहुदीतरांपासून मी तुझे रक्षण करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मी तुझे लोक व गैरयहूदी लोक यांच्यापासून तुझी सुटका करेन. मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 26:17
36 Iomraidhean Croise  

असे म्हणा : “हे आमच्या तारणार्‍या देवा, आम्हांला तार; आम्हांला राष्ट्रांतून सोडवून घेऊन एकत्र कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नामाचे उपकारस्मरण करू, आणि तुझ्या स्तवनातच आम्हांला उल्हास वाटेल.


नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो.


ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


कारण बाबर ओठांच्या व जड जिभेच्या लोकांकडे नव्हे, तर इस्राएल घराण्याकडे मी तुला पाठवतो;”


तेव्हा यहूदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले.


मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली.


नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानात गेले.


त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लगेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले.


कारण मी तुझ्याबरोबर आहे, आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही; कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.”


आणि, मेहेरबानी करून त्याला यरुशलेमेत बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे विनंती केली; वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता.


म्हणून तुम्हांला ठाऊक असो की, ‘हे देवाने सिद्ध केलेले तारण परराष्ट्रीयांकडे’ पाठवले आहे; आणि ते ते श्रवण करतील.”


परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे;


पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो. ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो;


ती कृपा अशी की, मी परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावे; अशासाठी की, परराष्ट्रीय हेच अर्पण पवित्र आत्म्याने शुद्ध होऊन मान्य व्हावे.


आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


ह्या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित (मी ख्रिस्ताठायी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही), विश्वास व सत्य ह्यांसंबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले.


मला त्या सुवार्तेचा घोषणकर्ता, प्रेषित व [परराष्ट्रीयांचा] शिक्षक असे नेमले होते.


मला अंत्युखियात, इकुन्यात व लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस; त्या सर्वांतून प्रभूने मला सोडवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan