Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 26:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा अहो राजे, वाटेवर दोन प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणार्‍या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 वाटेत भर दुपारच्या वेळी मी माझ्या व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला, तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 तेव्हा महाराज, वाटेवर मध्यान्हसमयी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणाऱ्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 महाराज अग्रिप्पा, मी वाटेने जात असताना दुपारच्या सुमारास, सूर्यप्रकाशाहून अधिक तेजस्वी प्रकाश माझ्या आणि माझ्या सोबत्यांच्या भोवती आकाशातून तळपताना मी पाहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 26:13
10 Iomraidhean Croise  

चंद्र तांबूस होईल, सूर्य फिक्का पडेल; कारण सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत आपल्या प्रजेतील वडिलांसमोर वैभवाने राज्य करील.


ज्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांचे घाव बांधील, त्यांच्या प्रहाराच्या जखमा बर्‍या करील, त्या दिवशी चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश सात दिवसांच्या प्रकाशाएवढा सातपट होईल.


तेव्हा त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले; त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.


मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्काजवळ पोहचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला.


तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला अन् ते घाबरले, परंतु माझ्याबरोबर बोलणार्‍याची वाणी त्यांनी ऐकली नाही.


हे चालू असता, मुख्य याजकांकडून अखत्यार व अधिकारपत्र मिळवून, मी दिमिष्काकडे चाललो होतो.


तेव्हा आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली की, ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारणे तुला कठीण.’


मग जाता जाता असे झाले की, तो दिमिष्काजवळ येऊन पोहचला त्या वेळी अकस्मात त्याच्यासभोवती आकाशातून प्रकाश चमकला.


त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा ‘परमतेजाने’ प्रकाशणार्‍या ‘सूर्यासारखी’ होती.


नगरीला ‘सूर्यचंद्राच्या प्रकाशाची’ आवश्यकता नाही; कारण ‘देवाच्या तेजाने’ ती ‘प्रकाशित केली आहे;’ आणि हाच कोकरा तिचा दीप आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan