Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 26:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःच्या तर्फे बोलण्यास परवानगी आहे. तेव्हा पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.” यावर पौलाने आपला हात उंच करून आपल्या बचावाचे भाषण सुरू केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःसाठी बोलावयास परवानगी आहे.” पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 अग्रिप्पा राजा पौलास म्हणाला, “तुला स्वतःविषयी बोलण्यास परवानगी देण्यात आली आहे.” तेव्हा पौलाने आपल्या हाताने खूण करून बचावाचे भाषण करण्यास सुरुवात केली:

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 26:1
12 Iomraidhean Croise  

मी राजांसमोरसुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही.


मी हाक मारली पण तुम्ही आला नाहीत; मी आपला हात पुढे केला, पण कोणी लक्ष दिले नाही;


ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.


जो आपला दावा प्रथम मांडतो त्याचा पक्ष खरा भासतो, पण त्याचा शेजारी येऊन त्याला कसाला लावतो.


तेव्हा पाहा, मी आपला हात तुझ्यावर उगारून तुझे नित्याचे अन्न कमी केले आणि ज्यांना तुझे शिंदळकीचे वर्तन लज्जास्पद वाटते त्या तुझा द्वेष करणार्‍या पलिष्ट्यांच्या कन्यांच्या स्वाधीन तुला केले.


“एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करतो ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?”


“बंधुजनहो व वडीलजनहो, मी जे आता तुम्हांला प्रत्युत्तर करतो ते ऐका.”


त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही.


कारण बंदिवानास पाठवताना त्याच्यावरील दोषारोप न कळवणे मला ठीक दिसत नाही.”


“अग्रिप्पा राजे, यहूद्यांच्या चालीरीती व त्यांच्या वादविषयक बाबी ह्यांत आपण विशेष जाणते आहात, आणि यहूदी ज्यांविषयी माझ्यावर दोषारोप ठेवतात त्या सर्वांविषयी मला आज आपणापुढे प्रत्युत्तर करायचे आहे, ह्यावरून मी स्वतःला धन्य समजतो; आणि मी आपल्याला विनंती करतो की, शांतपणे माझे भाषण ऐकून घ्यावे.


परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे;


पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, “आज्ञा मोडणार्‍या व उलटून बोलणार्‍या लोकांकडे मी सारा दिवस आपले हात पसरले आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan