Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 24:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 हा माणूस म्हणजे एक पीडा आहे असे आम्हांला आढळून आले आहे, आणि जगातल्या सर्व यहूदी लोकांत हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 हा मनुष्य म्हणजे एक पिडा आहे असे आम्हास आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकात हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 हा माणूस म्हणजे एक पीडा आहे, असे आम्हांला आढळून आले आहे. जगातल्या सर्व यहुदी लोकांत हा बंड करणारा असून नासरेथकर पंथाचा तो पुढारी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “हा मनुष्य त्रासदायक असल्याचे आम्हास आढळून आले आहे तो अवघ्या जगातील सर्व यहूदीयांना बंड करण्यास चिथावीत असतो. नासरेथकर पंथाचा हा पुढारी आहे

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 24:5
32 Iomraidhean Croise  

हामान अहश्वेरोश राजाला म्हणाला, “आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतांतून राहणार्‍या देशोदेशींच्या लोकांमध्ये पांगलेले व विखरलेले एक राष्ट्र आहे; त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्यांहून भिन्न आहेत. ते राजाच्या कायद्यांप्रमाणे चालत नाहीत म्हणून त्यांना राहू देणे राजाच्या हिताचे नाही.


तो बन्यामिनाच्या वेशीत प्रवेश करतो तर तेथे पहारेकर्‍यांचा नायक इरीया बिन शलेम्या बिन हनन्या होता; त्याने यिर्मया संदेष्ट्याला पकडून म्हटले, “तू खास्द्यांकडे फितूर होऊन जात आहेस.”


मग सरदार राजाला म्हणाले, “ह्या मनुष्याला जिवे मारा; कारण असले भाषण करून ह्या नगरात राहिलेल्या योद्ध्यांचे व सर्व लोकांचे हात तो निर्बळ करतो; हा मनुष्य ह्या लोकांचे हित नव्हे तर नुकसान करायला पाहतो.”


मग बेथेल येथील याजक अमस्या ह्याने इस्राएलाचा राजा यराबाम ह्याला निरोप पाठवला की, “इस्राएल घराण्याच्या भरवस्तीत आमोसाने फितुरी केली आहे, त्याची सर्व वचने देशाला सहन होत नाहीत.


शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्याला पुरे. घरधन्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील?


व नासेरथ नावाच्या गावी जाऊन राहिला; अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.


तो ओरडून म्हणाला, “हे येशू नासरेथकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करायला आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच!”


हा माणूस शहरात झालेला दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेला होता.


आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हांला आढळला.”


नंतर दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेल्या ज्याला त्यांनी मागितले होते त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपवून दिले.


तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले, “ह्याने गालीलापासून आरंभ करून येथपर्यंत सार्‍या यहूदीयात शिक्षण देऊन लोकांना चिथवले आहे.”


तरीपण परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, “त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळण्याची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे.”


आरोळी मारून म्हटले, “अहो इस्राएल लोकांनो, धावा हो धावा; आपले लोक, नियमशास्त्र व हे स्थळ ह्यांच्याविरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवतो तोच हा आहे; शिवाय ह्याने हेल्लेण्यांस मंदिरात आणून हे पवित्रस्थान विटाळवले आहे.”


ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, “जगातून ह्याला नाहीसे करा, ह्याची जगण्याची लायकी नाही.”


तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करतो;


तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहेरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे.


तो आल्यावर यरुशलेमेहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले.


ते पहिल्यापासून मला ओळखतात; म्हणून त्यांची मर्जी असल्यास ते साक्ष देतील की, आमच्या धर्माच्या अत्यंत कडकडीत पंथाप्रमाणे मी परूशी होतो.


तरी आपले विचार काय आहेत ते आपणापासून ऐकून घ्यावे हे आम्हांला योग्य वाटते; कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हांला ठाऊक आहे.”


तेव्हा प्रमुख याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकपंथी मत्सराने उठले


आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले; ते म्हणाले, “हा माणूस ह्या पवित्रस्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडत नाही;


कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस1 उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत.


आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो; आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहोत.


जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करतो तर ते उचित आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan