Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 23:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे शास्त्री परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही जण उठून तणतण करत म्हणाले, “ह्या माणसाच्या ठायी आम्हांला काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे? [आपण देवाशी भांडू नये].”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे नियमशास्त्र शिक्षक, परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले, “या मनुष्याच्या ठायी आम्हास काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्यांच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 तेथे मोठी गडबड उडाली. जे शास्त्री परुश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यांतून काही जण उठून तणतण करीत म्हणाले, “ह्या माणसाच्या ठायी आम्हांला काही वाईट दिसत नाही, कदाचित आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर खरोखर बोलला असेल!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तेव्हा मोठा गोंधळ सुरू झाला, काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते ते उठून उभे राहिले आणि जोरजोराने वादविवाद करू लागले. “आम्हाला या मनुष्यात काही अयोग्य असे आढळत नाही, ते म्हणाले, जर त्याच्याशी कदाचित एखादा आत्मा किंवा देवदूत बोलला असेल तर कसे समजावे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 23:9
23 Iomraidhean Croise  

मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला लावतो.


तेव्हा सरदार व सर्व लोक याजकांना व संदेष्ट्यांना म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडास पात्र नाही; कारण परमेश्वर आमचा देव ह्याच्या नामाने तो आमच्याबरोबर बोलला आहे.”


तेव्हा परूश्यांतील शास्त्री ह्यांनी त्याला जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर जेवताना पाहून त्याच्या शिष्यांना म्हटले, “हा जकातदार व पापी लोक ह्यांच्या-बरोबर का जेवतो?”


तो त्यांना तिसर्‍यांदा म्हणाला, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे? त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही; म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.”


तेव्हा मुख्य याजकांना व लोकसमुदायांना पिलाताने म्हटले, “मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही.”


तेव्हा परूशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांविरुद्ध कुरकुर करत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खातापिता?”


तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याबरोबर देवदूत बोलला.”


जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांनाही देवाने सारखेच दान दिले; तर मग देवाला अडवणारा असा मी कोण?”


मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्काजवळ पोहचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला.


तेव्हा मी जमिनीवर पडलो, आणि ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस?’ अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली.


तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले.


कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात.


परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही असे मला कळून आले, आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठवण्याचे मी ठरवले.


आणि एकीकडे जाऊन आपापसांत म्हणाले, “ह्या माणसाने मरणास किंवा बंधनास पात्र व्हावे असे काही केले नाही.”


कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,


परंतु ते देवाचे असल्यास तुम्हांला ते नष्ट करता यायचे नाही; तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.”


तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?”


आपण ‘प्रभूला ईर्ष्येस पेटवतो काय?’ आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय?


तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हांला काही सापडले नाही ह्याबद्दल आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे, व त्याचा अभिषिक्तही आज साक्षी आहे.” ते म्हणाले, “होय, तो साक्षी आहे.”


तो दाविदाला म्हणाला, “तू माझ्याहून नीतिमान आहेस; तू तर माझ्याशी भलाईने वागलास, पण मी तुझ्याशी वाईट वागलो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan