Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 23:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरूशलेमे शहरात माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरांतही तुला द्यावी लागेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 त्या रात्री प्रभू पौलच्या पुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर, जशी तू यरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्याच रात्री प्रभू पौलाजवळ उभा राहिले आणि त्याला म्हणाले, “धैर्य धर! येथे यरुशलेममध्ये तू माझ्याविषयी लोकांना जशी साक्ष दिलीस, तशीच साक्ष तुला रोममध्येही द्यावीच लागणार आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 23:11
27 Iomraidhean Croise  

कारण दरिद्र्याचा जीव दोषी ठरवणारे जे आहेत त्यांच्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी तो त्याच्या उजव्या हाताकडे उभा असतो.


तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.


हे कीटका, याकोबा, इस्राएलाचे लोकहो, भिऊ नका, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला साहाय्य करतो; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे.


तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.


मी आरंभीच शेवट कळवतो. होणार्‍या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे, ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.’


परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


मग पाहा, बाजेवर पडून असलेल्या कोणाएका पक्षाघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”


कारण मला पाच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी.’


मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन.


माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”


तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टान्तात म्हटले, “भिऊ नकोस; बोलत जा, उगा राहू नकोस.


हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्‍चय करून म्हटले, “तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.”


दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे;


पण आता पाहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमेस जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही;


कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्यांविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील.


तेव्हा मी त्याला पाहिले; तो मला म्हणाला, ‘त्वरा कर, यरुशलेमेतून लवकर निघून जा; कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.’


मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? आपल्या प्रभू येशूला मी पाहिलेले नाही काय? प्रभूमध्ये तुम्ही माझे काम नाही काय?


म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकांत व इतर सर्व जणांत, माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली;


तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan