Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 23:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता; ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकुम केला की, खाली जाऊन त्यास त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 असे त्यांच्यांत कडाक्याचे भांडण चालले असता ते पौलाच्या चिंधड्या उडवतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 वादाने उग्र स्वरूप धारण केले, सरतेशेवटी सेनापतीला भीती वाटली की ते पौलाचे फाडून तुकडे करतील. तेव्हा त्याने त्याच्या सैनिकांना हुकूम दिला की, त्यांनी खाली जाऊन त्याला त्यांच्यापासून जबरदस्तीने दूर करावे आणि पुन्हा बराकीत घेऊन यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 23:10
16 Iomraidhean Croise  

अहो देवाला विसरणार्‍यांनो, ह्याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हांला फाडून टाकीन, तेव्हा तुम्हांला कोणी सोडवणारा सापडणार नाही.


नाहीतर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकील; मला सोडवणारा कोणी नाही म्हणून तो माझे तुकडेतुकडे करील.


तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता, त्यांच्यावरचे कातडे सोलून काढतात, बहुगुण्यात टाकलेल्या किंवा कढईत असलेल्या मांसाच्या तुकड्यांप्रमाणे त्यांची हाडे मोडून तुकडे-तुकडे करतात.


मग पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटले, “मला आपल्याबरोबर काही बोलायची परवानगी मिळेल का?” तो म्हणाला, “हेल्लेणी भाषा तुला येते काय?


सरदाराने असा हुकूम केला की, त्याला गढीत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते हे समजण्यासाठी त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले.


ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या भाच्याने ऐकले, आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.


ह्या मनुष्याला यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्याला सोडवले;


आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्याला त्यांच्या न्यायसभेत खाली नेले.


आणि दुसर्‍या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले.


पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातांतून काढून नेले.


मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे;


माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हांला हे कळते. तर प्रत्येक माणूस ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा, रागास मंद असावा;


पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan