Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 22:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याविषयी प्रमुख याजक व सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेमेत शासन करण्यास आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्याविषयी महायाजक व सगळा वडिलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरूशलेम शहरात शासन करावयास आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 त्याविषयी उच्च याजक व सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे. मी त्यांच्याकडून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्क ह्या ठिकाणी चाललो होतो, ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेममध्ये शासन करावयास आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 महायाजक व येथे असलेले सर्व सभासद, ते स्वतः याबाबतीत साक्ष देऊ शकतात की, मी त्यांच्याकडून दिमिष्क येथील सभेच्या सदस्यांना दाखविण्यासाठी तशी पत्रेसुद्धा मिळविली होती आणि या लोकांना बंदिवान करून यरुशलेम येथे आणून त्यांना शिक्षा केली जावी यासाठी तिथे गेलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 22:5
21 Iomraidhean Croise  

मग उजाडल्यावर लोकांचे वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले; आणि ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले,


त्या दिवसांत पेत्र बंधुवर्गामध्ये (सुमारे एकशेवीस माणसांच्या जमावामध्ये) उभा राहून म्हणाला,


अहो बंधुजनहो, अब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो, व तुमच्यापैकी देवाचे भय बाळगणार्‍यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे.


बंधुजनहो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुमच्याबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे.


“बंधुजनहो व वडीलजनहो, मी जे आता तुम्हांला प्रत्युत्तर करतो ते ऐका.”


मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.”


तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, “बंधुजनहो, मी परूशी व परूश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.”


आणि तसे मी यरुशलेमेत केलेही; मी मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात कोंडून टाकले; आणि त्यांचा घात होत असताना मी संमती दिली.


प्रत्येक सभास्थानात त्यांना वारंवार शासन करून त्यांना दुर्भाषण करायला लावण्याचा प्रयत्न मी करत असे; त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरांपर्यंतदेखील मी त्यांचा पाठलाग करत असे.


हे चालू असता, मुख्य याजकांकडून अखत्यार व अधिकारपत्र मिळवून, मी दिमिष्काकडे चाललो होतो.


मग असे झाले की, तीन दिवसांनंतर पौलाने यहूद्यांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा पूर्वजांच्या संप्रदायांविरुद्ध काही केले नसता मला यरुशलेमेत बंदिवान करून रोमी लोकांच्या हाती देण्यात आले.


त्यांनी त्याला म्हटले की, ‘आपल्यासंबंधाने यहूदीयाहून आम्हांला काही पत्रे आली नाहीत, किंवा बंधुजनांपैकी कोणी येथे येऊन आपणाविषयी काही प्रतिकूल बातमी आणली नाही अथवा काही सांगितले नाही;


बंधुजनहो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकार्‍यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे.


नंतर दुसर्‍या दिवशी असे झाले की, त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री,


हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे, प्रमुख याजक व त्याच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले.


आणि येथेही तुझे नाव घेणार्‍या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे.”


यहूदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत असे व तिचा नाश करत असे;


आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.


तुझ्यावर वडीलवर्ग2 हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan