Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 22:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मग त्यांनी त्याला वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला पौलाने म्हटले, “रोमी मनुष्याला व तशात ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मग त्यांनी त्यास वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधीपतीला पौलाने म्हटले, “रोमन मनुष्यास व ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 परंतु त्यांनी त्याला बांधावयास सुरुवात केली तेव्हा जवळ उभ्या असलेल्या रोमन अधिकाऱ्याला पौलाने विचारले, “ज्या रोमन नागरिकाला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 जेव्हा ते पौलाला फटके मारण्यासाठी बांधत होते त्यावेळेस पौल तिथे उभा असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्या मनुष्यावर दोषारोप अजून सिद्ध झालेला नाही, अशा रोमी नागरिकाला फटके मारणे हे कायद्याने योग्य आहे का?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 22:25
13 Iomraidhean Croise  

माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील,


शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले.


तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही; पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.


कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा कोणीएक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता.


परंतु पौल त्यांना म्हणाला, “आम्ही रोमी माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हांला उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हांला गुप्तपणे घालवतात काय? हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हांला बाहेर काढावे.”


हे ऐकून शताधिपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमी आहे.”


तेव्हा पौलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, “ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा; ह्याला त्यास काही सांगायचे आहे.”


ह्या मनुष्याला यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्याला सोडवले;


त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही.


नंतर आम्ही इटली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसर्‍या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा यूल्य नावाचा शताधिपती ह्याच्या स्वाधीन करण्यात आले.


दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोनास पोहचलो, तेव्हा यूल्याने पौलाबरोबर सौजन्याने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली.


तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने शताधिपती त्यांच्या बेतास आडवा आला; आणि त्याने हुकूम दिला की, ‘ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनार्‍यास जावे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan