Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 21:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग दुसर्‍या दिवशी [पौल व त्याचे सोबती] आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो; हा सातांपैकी एक होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो, तो निवडलेल्या सात सेवकांपैकी एक होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरिया येथे आलो आणि शुभवर्तमान प्रचारक फिलिप ह्याच्या घरी उतरलो, यरुशलेममध्ये ज्या सात लोकांना साहाय्यक म्हणून निवडले होते, त्यांच्यापैकी हा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 दुसर्‍या दिवशी आम्ही निघालो व कैसरीया येथे पोहोचलो आणि सुवार्तिक फिलिप्पाच्या घरी राहिलो, तो सात जणांपैकी एक होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 21:8
18 Iomraidhean Croise  

कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा कोणीएक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता.


त्याला असा दृष्टान्त झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगण्यास देवाने आम्हांला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लगेच विचार केला.


मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हांला वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो.


मग असे झाले की, आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता कोणीएक मुलगी आम्हांला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैवप्रश्‍न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे.


मग कैसरीयास पोहचल्यावर तो वरती गेला, आणि मंडळीचा निरोप घेऊन अंत्युखियास खाली गेला.


आम्ही आधीच जाऊन तारवात बसून अस्साकडे गेलो, तेथे पोहचल्यावर पौलाला तारवात घ्यायचे होते; कारण त्याने तसे ठरवले होते व तो स्वतः पायवाटेने येणार होता.


आणि बेखमीर भाकरीच्या दिवसांनंतर आम्ही फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसांनी त्रोवसात त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही सात दिवस राहिलो.


आमच्याबरोबर कैसरीयातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले; त्याच्या येथे आम्ही राहणार होतो.


मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी रात्रीच्या तिसर्‍या ताशी तयार ठेवा;


नंतर आम्ही इटली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसर्‍या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा यूल्य नावाचा शताधिपती ह्याच्या स्वाधीन करण्यात आले.


ह्याप्रमाणे तीन महिन्यांनंतर आलेक्सांद्रियाचे दयस्कुरै2 ह्या निशाणीचे एक तारू हिवाळा घालवण्याकरता त्या बेटाजवळ राहिले होते, त्यात बसून आम्ही निघालो.


आम्ही रोम शहरात गेल्यावर [शताधिपतीने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण] पौलाला त्याच्यावर पहारा करणार्‍या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.


ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली; आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व यहूदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली.


बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरीयात नेले व पुढे तार्सास पाठवले.


आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले;


तू तर सर्व गोष्टींविषयी सावध राहा, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan