Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 21:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आमच्याबरोबर कैसरीयातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले; त्याच्या येथे आम्ही राहणार होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हास म्नासोन नावाच्या व्यक्तीकडे घेऊन गेले, कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो, तो कुप्रचा असून सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 आमच्याबरोबर कैसरियातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले, त्याच्या घरी आम्ही राहणार होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 कैसरीयातील काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि त्यांनी आम्हाला जिथे राहणार होतो त्या म्नासोनच्या घरी आणले. हा मनुष्य सायप्रसचा असून प्रारंभीच्या शिष्यांपैकी एक होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 21:16
15 Iomraidhean Croise  

वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील;


पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; नीतिमत्तेच्या मार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो;


तिसर्‍या दिवशी तो कैसरीयास पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांना व इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता.


मग ‘प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा’ अशी त्याने आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.


स्तेफनावरून उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून यहूद्यांना मात्र देवाचे वचन सांगत असत.


ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला;


तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून तुमच्यामध्ये देवाने माझी निवड केली.


मग दुसर्‍या दिवशी [पौल व त्याचे सोबती] आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो; हा सातांपैकी एक होता.


कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्णबा (म्हणजे बोधपुत्र) म्हणत. त्याची शेतजमीन होती;


इकडे फिलिप्प अजोत नगरात आढळला आणि कैसरीया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यांतून जाताना त्याने सुवार्ता सांगितली.


माझे नातेवाईक व सोबतीचे बंदिवान अंद्रोनीक व युनिया ह्यांना सलाम सांगा; ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते.


तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान,


Lean sinn:

Sanasan


Sanasan