Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 21:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचवता, हे काय? मी नुसता बंधनात पडायलाच नाही, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायलादेखील तयार आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेम शहरामध्ये मरायलादेखील तयार आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचविता काय? मी नुसता तुरुंगात पडण्यासच नव्हे, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलममध्ये मरावयासदेखील तयार आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 पौल म्हणाला, “तुम्ही रडून माझे हृदय का तोडता? यरुशलेममध्ये केवळ तुरुंगात पडण्याचीच माझी तयारी नाही, तर प्रभू येशूंच्या नावासाठी मरण्यास देखील मी तयार आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 21:13
25 Iomraidhean Croise  

त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले; पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नामाने ओतले.


तुम्ही माझ्या लोकांना चिरडता, दीनांचे तोंड ठेचता, हे काय?” असे प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचे म्हणणे आहे.


गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यरुशलेम व यहूदा ह्यांतील जे लोक बंदिवान करून बाबेलास नेले त्या सर्वांबरोबर यिर्मयालाही बेड्या घालून रामा येथे आणले होते; तेथे त्याने यिर्मयाची सुटका केल्यानंतर यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे :


“बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले, ही म्हण तुम्ही इस्राएल देशात वापरता ती का?


तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “अरे, झोप घेत काय पडलास? ऊठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही.”


मी कशाचीही काळजी करीत नाही; मी आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.


तेव्हा ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले.


ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करत न्यायसभेपुढून निघून गेले.


आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन.”


बंधुजनहो, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्या ठायी मला तुमच्याविषयी जो अभिमान आहे त्याला स्मरून मी प्रतिज्ञेवर सांगतो की, मी रोज रोज मरतो.


तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वत: अर्पण केला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;


कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत झाला होता;


तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यांमध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे;


कारण आता माझे अर्पण होत आहे, आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे.


कारण मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळवल्याप्रमाणे मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे;


त्याला त्यांनी कोकर्‍याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले; आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही.


धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.


तिचा पती एलकाना तिला एकदा म्हणाला, “हन्ना, तू का रडतेस? तू अन्नपाणी का वर्ज केलेस? तुझे हृदय खिन्न का? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?”


शमुवेल म्हणाला, “तर शेरडामेंढरांचे बेंबावणे आणि गुरांचे हंबरणे माझ्या कानी पडत आहे ह्याचा अर्थ काय?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan