Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 20:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि युतुख नावाचा कोणीएक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंगला होता. तेव्हा पौल फार वेळ भाषण करत राहिल्यामुळे तो झोपेच्या गुंगीत तिसर्‍या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता, पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला, जेव्हा त्यास उचलले, तेव्हा तो मरण पावलेला आढळला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने त्याचे डोळे जड होऊ लागले. पौल फार वेळ भाषण करत राहिल्यामुळे युतुख झोपेच्या गुंगीत तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तेव्हा पौल बोलत राहिल्यामुळे युतुख नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता, त्याला गुंगी येऊन गाढ झोप लागली. तो गाढ झोपेत असताना, तिसर्‍या मजल्यावरून खाली जमिनीवर पडला आणि त्यास उचलले तेव्हा तो मरण पावला आहे असे दिसून आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 20:9
9 Iomraidhean Croise  

तो तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला घेऊन ये.” त्याने त्याला तिच्या कवेतून घेऊन आपण राहत होता त्या माडीवर नेले आणि आपल्या बिछान्यावर निजवले.


नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हांला झोपा काढत असलेले पाहील.


तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला, आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले.


नंतर अंत्युखिया व इकुन्या येथून कित्येक यहूदी आले; त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले.


तेव्हा पौल खाली उतरला आणि त्याच्यावर पाखर घालून व त्याला कवटाळून म्हणाला, “घाबरू नका; कारण हा अजून जिवंत आहे.”


मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले; तो दुसर्‍या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले.


ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो तेथे बरेच दिवे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan