Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 20:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आणि बेखमीर भाकरीच्या दिवसांनंतर आम्ही फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसांनी त्रोवसात त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही सात दिवस राहिलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 बेखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसानी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 बेखमीर भाकरीच्या दिवसानंतर आम्ही फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसांनी त्रोवस येथे त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही एक आठवडा राहिलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु आम्ही बेखमीर भाकरीच्या सणानंतर फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसानंतर त्रोवास येथे एकत्रित जमलो. तिथे आम्ही सात दिवसांचा मुक्काम केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 20:6
18 Iomraidhean Croise  

बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमलेल्या समयी सात दिवस तू बेखमीर भाकरी खा, कारण त्याच महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.


बेखमीर भाकरीचा सण पाळ. माझ्या आज्ञेला अनुसरून अबीब महिन्याच्या नेमलेल्या समयी सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास.


ते यहूदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते.


त्याला असा दृष्टान्त झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगण्यास देवाने आम्हांला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लगेच विचार केला.


तेथून फिलिप्पैस गेलो; ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो.


मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवसाला खाली गेले.


आपल्याला आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस बाजूला टाकून जाण्याचा पौलाने निश्‍चय केला होता; कारण कसेही करून पन्नासाव्या दिवसाच्या सणात1 आपण यरुशलेमेत असावे ह्यासाठी तो घाई करत होता.


ते पुढे जाऊन त्रोवसात आमची वाट पाहत राहिले;


आणि शोध केल्यावर आम्हांला शिष्य भेटले म्हणून आम्ही तेथे सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याच्या द्वारे पौलाला म्हटले, “तुम्ही यरुशलेमेत पाऊल टाकू नका.”


मग दुसर्‍या दिवशी [पौल व त्याचे सोबती] आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो; हा सातांपैकी एक होता.


तेथे आम्हांला बंधुजन भेटले; त्यांनी आपल्या येथे सात दिवस राहण्याची आम्हांला विनंती केली; अशा रीतीने आम्ही रोम शहरास आलो.


फिलिप्पै येथील सर्व अध्यक्ष1 व सर्व सेवक2 ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणार्‍या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तीमथ्य ह्यांच्याकडून :


परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दु:ख भोगून व उपमर्द सोसून, (हे तुम्हांला माहीतच आहे,) मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले.


माझा झगा त्रोवसात कार्पाजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये; आणि पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेही आण.


Lean sinn:

Sanasan


Sanasan