Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 20:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पुर्राचा मुलगा सोपत्र बिरुयाकर, थेस्सलनीकाकरांतले अरिस्तार्ख व सकूंद, गायस दर्बेकर, तीमथ्य आणि आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्याच्याबरोबर काही लोक होते ते असेः बिरुया नगराच्या पुर्राचा मुलगा सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकुंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 बिरुया येथला पुर्राचा मुलगा सोपत्र तसेच थेस्सलनीकर अरिस्तार्ख, सकूंद, गायस दर्बेकर, तीमथ्य, आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्याच्याबरोबर बिरुया मध्ये राहणारा पुर्राचा पुत्र सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकूंद, दर्बे येथील गायस व तीमथ्य देखील, तसेच आशिया प्रांतातील तुखिक व त्रोफिम होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 20:4
29 Iomraidhean Croise  

पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात निघून आला; मग दुसर्‍या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बेस गेला.


हे ओळखून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र व दर्बे ह्या नगरांत व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले;


मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणार्‍या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता; पण त्याचा बाप हेल्लेणी होता.


नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतांमधून गेले.


नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहूद्यांचे सभास्थान होते.


तरीपण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकातल्या यहूद्यांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळवून चेतवले.


इतक्यात नगरात गोंधळ उडाला; आणि पौलाचे वाटेतले सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढत ओढत ते एकजुटीने नाटकगृहात धावत गेले.


पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आसिया,


आपल्याला आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस बाजूला टाकून जाण्याचा पौलाने निश्‍चय केला होता; कारण कसेही करून पन्नासाव्या दिवसाच्या सणात1 आपण यरुशलेमेत असावे ह्यासाठी तो घाई करत होता.


ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांना म्हटले : “मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुमच्याबरोबर नेहमी कसा होतो,


त्यांनी इफिसकर त्रफिम ह्याला पूर्वी त्याच्याबरोबर शहरात पाहिले होते; त्याला पौलाने मंदिरात आणले असावे, अशी त्यांची कल्पना होती.


तेव्हा आम्ही आशिया प्रांताच्या किनार्‍यावरील बंदरे करणार्‍या अद्रमुत्तीय नगराच्या एका तारवात बसून निघालो; तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीकाचा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.


माझा सहकारी तीमथ्य व माझे नातेवाईक लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.


माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस ह्याचा तुम्हांला सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्‍वर्त ह्यांचा तुम्हांला सलाम.


करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून :


कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आमच्याकडून म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुमच्यामध्ये झाली ती होय, नाही, अशी नव्हती, तर त्याच्या ठायी होय अशीच होती.


माझे कसे काय चालले आहे हे तुम्हांलाही समजावे म्हणून प्रिय बंधू व प्रभूमध्ये विश्वासू सेवक जो तुखिक तो तुम्हांला सर्वकाही कळवील.


तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्याला मी तुमच्याकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे.


माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हांला सलाम सांगतो, आणि बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हांला सलाम सांगतो, (त्याच्याविषयी तुम्हांला आज्ञा मिळाल्या आहेत, तो तुमच्याकडे आला तर त्याचा स्वीकार करा);


प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयीच्या सर्व गोष्टी तुम्हांला कळवील.


देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून : विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य ह्याला,


देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया व शांती असो.


तुखिकाला मी इफिसास पाठवले आहे.


एरास्त करिंथात राहिला; त्रफिम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो.


मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझ्याकडे पाठवल्यावर होईल तितके करून माझ्याकडे निकपलिसास निघून ये, कारण तेथे हिवाळा घालवण्याचे मी ठरवले आहे.


आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला सलाम सांगतात.


प्रिय गायस ह्याला, तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील2 ह्याच्याकडून :


Lean sinn:

Sanasan


Sanasan