Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 20:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 पश्‍चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहूदी व हेल्लेणी ह्यांना मी साक्ष देत होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांस सारखीच साक्ष दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 पश्चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहुदी व ग्रीक ह्यांना मी साक्ष देत होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्यांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळणे आवश्यक आहे आणि आपल्या प्रभू येशूंवर विश्वास ठेवावा याविषयी यहूदी व गैरयहूदी लोकांमध्ये मी घोषणा करीत आलो आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 20:21
51 Iomraidhean Croise  

“पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”


तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की, “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”


“काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्‍चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.”


ते तेथून निघाले व लोकांनी पश्‍चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली,


मी तुम्हांला सांगतो, नव्हते; तरीपण जर तुम्ही पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.”


मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्ही पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”


त्याप्रमाणे, पश्‍चात्ताप करणार्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.”


त्याप्रमाणे ज्यांना पश्‍चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणार्‍या आनंदापेक्षा पश्‍चात्ताप करणार्‍या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो.


कारण मला पाच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी.’


आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्‍चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.


येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत.


जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्रावर विश्‍वास ठेवीत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.


त्याच्यावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.”


हे ऐकून ते उगे राहिले आणि देवाचा गौरव करत बोलले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्‍चात्तापबुद्धी दिली आहे.”


ते म्हणाले, “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”


अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्‍चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो.


मग इफिसात राहणारे यहूदी व हेल्लेणी ह्या सर्वांना हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला.


पेत्र त्यांना म्हणाला, “पश्‍चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.


आणखी त्याने दुसर्‍या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”


केवळ इतके कळते की, बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत; ह्याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे.


मी कशाचीही काळजी करीत नाही; मी आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.


मग काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला, व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले.


मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’


तर पहिल्याने दिमिष्कातील लोकांना व यरुशलेमेत, अवघ्या यहूदीया देशात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करत आलो की, पश्‍चात्ताप करा आणि पश्‍चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.


तेव्हा त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिर्‍हाडी आले; त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करत होता.


तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावेत;


नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरुशलेमेत परत आले, आणि येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांतून सुवार्ता सांगितली.


हेल्लेणी व बर्बर,1 ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा मी ऋणी आहे.


कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला — प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला — तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.


की, येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्या मुखाने’ कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा ‘आपल्या अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.


किंवा देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?


तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणार्‍या आपणांसाठीही ते लिहिलेले आहे, त्या आपणांलाही ते गणले जाणार आहे.


ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे.


कारण यहूदी चिन्हे मागतात व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात,


कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्‍चात्तापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते.


तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे; कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी ‘मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.’


मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिले.


तरी शास्त्राने सर्वांना पापामध्ये कोंडून ठेवले आहे; ह्यात उद्देश हा की, विश्वास ठेवणार्‍यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे.


म्हणून तुमच्या ठायी असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून,


तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे, आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे.


येशू हा ख्रिस्त आहे, असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे, आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो.


येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे?


Lean sinn:

Sanasan


Sanasan