Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 20:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नंतर गलबला निवाल्यावर पौलाने शिष्यांना बोलावून त्यांना बोध केला, व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्यास निघाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलावले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला आणि तो मासेदोनियाला निघाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 नंतर गलबला शांत झाल्यावर पौलाने शिष्यांना बोलावून त्यांना बोध केला व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्यास निघाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जेव्हा गडबड शांत झाली, तेव्हा पौलाने शिष्यांना बोलाविले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर, त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियाला जाण्यास निघाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 20:1
20 Iomraidhean Croise  

इस्राएलाची दृष्टी वयाच्या मानाने मंद झाली होती, म्हणून त्याला बरोबर दिसत नव्हते. योसेफाने त्यांना त्याच्याजवळ नेले. तेव्हा त्याने त्यांचे चुंबन घेऊन त्यांना आलिंगन दिले.


त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियास आणले. मग असे झाले की, त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळूनमिसळून बर्‍याच लोकांना शिकवले; आणि शिष्यांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा अंत्युखियात मिळाले.


तेथून फिलिप्पैस गेलो; ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो.


तेथे रात्री पौलाला असा दृष्टान्त झाला की, मासेदोनियाचा कोणीएक माणूस उभा राहून आपणाला विनंती करत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हांला साहाय्य कर.”


हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्‍चय करून म्हटले, “तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.”


तेव्हा पौल खाली उतरला आणि त्याच्यावर पाखर घालून व त्याला कवटाळून म्हणाला, “घाबरू नका; कारण हा अजून जिवंत आहे.”


त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो हेल्लास प्रांतात गेला.


तेथे तीन महिने राहिल्यावर तो सूरिया देशात तारवातून जाणार होता, पण यहूदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट केला, तेव्हा त्याने मासेदोनियातून परत जाण्याचा बेत केला.


तेव्हा ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले.


पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात.


सर्व बंधू तुम्हांला सलाम सांगतात. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.


मी मासेदोनियातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी मासेदोनियातून जाणार आहे;


पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा.


आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हांला शारीरिक स्वस्थता अशी नव्हतीच, तर आम्ही चहूकडून गांजलेले होतो; बाहेर भांडणतंटे, आत भीती.


पवित्र चुंबनाने सर्व बंधुवर्गाला सलाम करा.


मी मासेदोनियास जाताना तुला इफिसात राहण्याची विनंती केली, ह्यासाठी की, तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की, अन्य शिक्षण देऊ नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan