Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 2:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

46 ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 दररोज मंदिराच्या अंगणात ते एकत्र जमत होते आणि त्यांच्या घरांमध्ये भाकर मोडीत असत आणि मोठ्या आनंदाने व कृतज्ञ मनाने एकत्र खात होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 2:46
25 Iomraidhean Croise  

तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”


हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.


जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.


डोळा शरीराचा दिवा आहे; ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल;


तर जे आत आहे त्याचा2 दानधर्म करा म्हणजे पाहा, सर्व तुम्हांला शुद्ध आहे.


मग असे झाले की, तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली.


आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले.


मग त्याने त्यांना घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला.


ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत.


मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले; तो दुसर्‍या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले.


पेत्र व योहान हे तिसर्‍या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते.


हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे, प्रमुख याजक व त्याच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले.


आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही.


बोध करणार्‍याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणार्‍याने ते औदार्याने द्यावे, अधिकार्‍याने आपले काम आस्थेने करावे, दया करणार्‍याने ती संतोषाने करावी.


जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही?


आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.


तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.


दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतःकरणाने आपल्या देहदशेतील धन्यांचे आज्ञापालन करत जा;


तेथे तुम्ही आपले मुलगे व मुली, दास व दासी ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करावा; तुमच्या वेशींच्या आत राहणार्‍या लेव्यासहित आनंद करावा, कारण तुमच्याबरोबर त्याला काही वाटा किंवा वतन नाही.


तेथे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर भोजन करावे आणि ज्या ज्या कामात तुम्ही हात घातला व ज्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला यश दिले त्या सर्वांबद्दल तुम्ही व तुमच्या घरच्या माणसांनी आनंद करावा.


तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी, आणि तुझ्या गावातला लेवी, आणि तुमच्यामध्ये असलेला उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.


दासांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा, माणसांना संतोषवणार्‍या नोकरांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan