Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 2:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 आणखी त्याने दुसर्‍या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून; म्हटले, “या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

40 आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना आर्जवून म्हटले, “ह्या भ्रष्ट पिढीला होणाऱ्या शिक्षेपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 आणखी त्याने पुष्कळ शब्दांनी त्यांना इशारा दिला आणि विनवणी करून म्हटले, “या भ्रष्ट पिढीपासून तुम्ही स्वतःला वाचवा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 2:40
34 Iomraidhean Croise  

भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा; आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला.”


माझ्या लोकांनो, तुम्ही त्यांच्यातून निघून जा! परमेश्वराच्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा.


अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.


दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्हावाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला.


तेव्हा येशूने उत्तर दिले, “अरेरे, हे विश्वासहीन व कुटिल पिढी! मी कोठवर तुमच्याबरोबर राहावे? कोठवर तुमचे सोसावे? त्याला येथे माझ्याजवळ आणा.”


अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल?


ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल.”


कारण मला पाच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी.’


तुम्ही तर होणार्‍या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.”


येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एकेक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.


त्याने आम्हांला अशी आज्ञा केली की, ‘लोकांना उपदेश करा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे.’


यहूदा व सीला हे स्वत: संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.


मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटपर्यंत त्यांच्याबरोबर संभाषण केले व तो तसाच निघून गेला.


त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो हेल्लास प्रांतात गेला.


पश्‍चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहूदी व हेल्लेणी ह्यांना मी साक्ष देत होतो.


मी कशाचीही काळजी करीत नाही; मी आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.


आणि युतुख नावाचा कोणीएक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंगला होता. तेव्हा पौल फार वेळ भाषण करत राहिल्यामुळे तो झोपेच्या गुंगीत तिसर्‍या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला.


तेव्हा त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिर्‍हाडी आले; त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करत होता.


कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्णबा (म्हणजे बोधपुत्र) म्हणत. त्याची शेतजमीन होती;


म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.


म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’


सुंता करून घेणार्‍या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्‍चितार्थाने सांगतो की, ‘तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस.’


म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्‍चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये;


ते बिघडले आहेत, ते त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे; ही विकृत व कुटिल पिढी आहे.


ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता;


तुम्हांला ठाऊकच आहे की, बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की,


आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वत:चे व तुझे ऐकणार्‍यांचेही तारण साधशील.


माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहवून पाठवून ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan