Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 2:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 कारण हे वचन तुम्हास तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत, त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 कारण देवाचे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना आपला प्रभू परमेश्वर स्वतःकडे बोलावितो तितक्यांना दिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 हे वचन तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी आणि सर्वांसाठी जे फार दूर आहेत आणि ज्यांना प्रभू आमचे परमेश्वर बोलावतील त्यांच्यासाठी आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 2:39
41 Iomraidhean Croise  

कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि रुक्ष भूमीवर जलधारा ओतीन; मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करीन.


तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.


मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत, त्यांना शांती असो, शांती असो; मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो.


ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील; कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्याविरुद्ध झेंडा उभारील.


“तो सीयोनेकडे आणि याकोबापैकी जे अधर्मापासून परावृत्त झाले त्यांच्याकडे उद्धारकर्ता म्हणून येईल,” असे परमेश्वर म्हणतो.


त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्यांच्याजवळ राहतील.


जो देश माझा सेवक याकोब ह्याला मी दिला व ज्यात तुमचे पूर्वज राहत असत त्यात ते वस्ती करतील; तेथे ते व त्यांचे पुत्रपौत्र सर्वकाळ वस्ती करतील; माझा सेवक दावीद त्यांच्यावर सर्वकाळचा अधिपती होईल.


ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील.


तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल; कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलावले ते बाकी उरलेल्यांत राहतील.


मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणार्‍या व सुंता झालेल्या सर्व लोकांना आश्‍चर्य वाटले.


तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले.


परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरता काही लोक काढून घ्यावेत म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे; आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तींचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की,


मग मंडळीने त्यांची बोळवण केल्यावर ते फेनिके व शोमरोन ह्यांमधून गेले, आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.


आणि हृदये जाणणार्‍या देवाने जसा आपल्याला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली.


कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही.


ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले; आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला.


ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत;


कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे; असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती; परंतु आता ती पवित्र आहेत.


म्हणजे त्यामुळे तुमचे अंतश्‍चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, ‘पवित्र जनांमध्ये’ त्याने दिलेल्या ‘वतनाच्या’ वैभवाची समृद्धी केवढी,


ते तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारांना परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता.


तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे.


तर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर जो आज येथे उभा आहे आणि जो येथे हजर नाही त्याच्याशीही करतो.


ह्याकरता तर आम्ही तुमच्यासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हांला झालेल्या ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे;


त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वत:च्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे; ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती;


म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदारहो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक2 ख्रिस्त येशू ह्याच्याकडे लक्ष लावा.


आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकरता आहे की, पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने, सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे.


आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील.


म्हणून बंधूंनो, तुम्हांला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही;


ज्याने तुम्हाआम्हांला आपल्या गौरवासाठी व सात्त्विकते-साठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत;


हे कोकर्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांना जिंकील, कारण तो ‘प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे;’ आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत.”


तेव्हा तो मला म्हणाला, “हे लिही की, कोकर्‍याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan