Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकेक अशा बसल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 नंतर अग्नीसारख्या निरनिराळ्या जिभा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर एक एक अशा स्थिरावल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्‍या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 2:3
18 Iomraidhean Croise  

परमेश्वर म्हणाला, “पाहा, हे लोक एक आहेत, ह्या सर्वांची भाषाही एकच आहे, ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे; आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास ह्यांना कशानेही अटकाव होणार नाही.


हे प्रभू, त्यांचा विध्वंस कर, त्यांच्या भाषेचा गोंधळ कर; कारण मी नगरात जुलूम व कलह पाहिले आहेत.


तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!”


परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे-तुकडे करणार्‍या हातोड्यासारखे नव्हे काय?


मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्‍चात्तापासाठी करतो खरा; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याचीदेखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.


येशूने त्याला उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणांला उचित आहे.” तेव्हा त्याने तसे होऊ दिले.


तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”


त्या दिवसांत पेत्र बंधुवर्गामध्ये (सुमारे एकशेवीस माणसांच्या जमावामध्ये) उभा राहून म्हणाला,


क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”


तेव्हा अकस्मात मोठ्या वार्‍याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले.


तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.


एखाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती; एखाद्याला संदेश देण्याची शक्ती; एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती; एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते;


जीभ ही आग आहे; ती अनीतीचे भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे.


माझे दोन साक्षी ह्यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.”


नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणार्‍यांना म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्यांना सांगण्यास सार्वकालिक सुवार्ता होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan