Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 19:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करू लागले, तेव्हा त्याने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले, आणि तुरन्नाच्या पाठशाळेत तो दररोज वादविवाद करू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि ख्रिस्ताच्या मार्गाविषयी वाईट बोलले, मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 परंतु काही जण निगरगट्ट बनून श्रद्धा न ठेवता लोकांसमक्ष प्रभूच्या मार्गाची निंदा करू लागले. पौलाने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले आणि तुरन्नच्या सभागृहात तो दररोज वादविवाद करू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 परंतु काहीजण हटवादी झाले; त्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले आणि जाहीरपणे द्वेषाच्या भावनेने त्या मार्गाविषयी विषयी बोलू लागले. तेव्हा पौल त्यांच्यामधून निघून गेला व शिष्यांना आपल्याबरोबर घेऊन त्याने तुरन्नाच्या व्याख्यानगृहात रोज संवाद केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 19:9
39 Iomraidhean Croise  

इतके असूनही ते ऐकेनात; तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास न ठेवता मान ताठ केली त्याप्रमाणे त्यांनी केले.


तुम्ही आपल्या पूर्वजांप्रमाणे ताठ मानेचे होऊ नका, तर परमेश्वराला शरण जा आणि जे पवित्रस्थान त्याने कायमचे पवित्र केले आहे, त्याच्याजवळ या व तुमचा देव परमेश्वर ह्याची उपासना करून त्याच्या भडकलेल्या कोपाचे निवारण करा.


पण ते देवाच्या दूतांची टर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.


त्यांना पुन्हा नियमशास्त्राप्रत आणावे म्हणून तू त्यांना बजावून सांगितले तरी त्यांनी उन्मत्त होऊन तुझ्या आज्ञांचा अवमान केला आणि जे निर्णय पाळल्याने मनुष्य जिवंत राहतो ते न जुमानता त्यांनी पाप केले; त्यांनी आपला खांदा जुवाखालून काढून घेतला, मान ताठ केली व ते ऐकतनासे झाले.


मरीबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका;


जो माझ्या दारांशी नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबांजवळ उभा राहून, माझे ऐकतो तो धन्य.


म्हणजे तो तुम्हांला पवित्रस्थान होईल; तथापि इस्राएलाच्या उभय घराण्यांत तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि यरुशलेमेच्या रहिवाशांना पाश व सापळा असा होईल.


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या नगरावर व त्याच्या सर्व गावांवर जे अरिष्ट आणणार म्हणून म्हणालो ते सर्व आणीन, कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.”


पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले.


त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”


दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्हावाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला.


त्याच वेळेस येशू लोकसमुदायांना म्हणाला, “एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरण्यास तुम्ही तलवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहात काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हा तुम्ही मला धरले नाही.


“त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.”


त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियास आणले. मग असे झाले की, त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळूनमिसळून बर्‍याच लोकांना शिकवले; आणि शिष्यांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा अंत्युखियात मिळाले.


तेव्हा नगरातील लोकसमुदायात फूट पडली; कित्येकांनी यहूद्यांची बाजू धरली तर कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली.


तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खातरी होऊन ते पौल व सीला ह्यांना येऊन मिळाले; आणि भक्तिमान हेल्लेणी ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्याथोडक्या नव्हत्या.


ह्या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली.


तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्यांनी त्याला जाऊ दिले नाही.


म्हणून मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही ही आठवण ठेवून सावध राहा.


पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देईपर्यंत मी ह्या पंथाचा पाठलाग केला.


त्यांच्यामध्ये उभे राहून, ‘मेलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे,’ हे शब्द मी मोठ्याने बोललो; हा एवढा उद्‍गार अपराध असला तर असेल.”


तरी आपले विचार काय आहेत ते आपणापासून ऐकून घ्यावे हे आम्हांला योग्य वाटते; कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हांला ठाऊक आहे.”


अहो ‘ताठ मानेच्या’ आणि ‘हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो,’ तुम्ही तर ‘पवित्र आत्म्याला’ सर्वदा ‘विरोध करता;’ जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.


त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे.


तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल जोराचा प्रयत्न करत आहे ते त्याला मिळाले नाही; पण निवडलेल्या लोकांना मिळाले; आणि बाकीचे कोडगे झाले.


ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल त्याला तो ‘कठीण हृदयाचे करतो.’


कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे; आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत.


मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणार्‍या माणसांची एकसारखी भांडणे होतात; [त्यांच्यापासून दूर राहा.]


जे आशियात आहेत ते सर्व माझ्यापासून फुटले, हे तुला ठाऊकच आहे; त्यांत फुगल व हर्मगनेस हे आहेत.


सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासूनही दूर राहा.


वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर.


जोपर्यंत “आज” म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये.


पण हे लोक स्वतःला न कळणार्‍या गोष्टींविषयी निंदा करत असतात; नैसर्गिक नियमानुसार पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या निर्बुद्ध पशूंसारखे ते आहेत; त्यांचा स्वत:च्या भ्रष्टतेतच नाश होईल.


त्यांच्या कामातुर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील; त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल.


तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करतात आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशूंप्रमाणे ह्यांना स्वभावत: समजतात त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan