Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 19:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करत व प्रमाण पटवत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पौल यहूदी सभास्थानात जात असे व तीन महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहूदी लोकांचे मन वळवीत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 पौल सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने निर्भीडपणे संदेश देत गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मग पौलाने सभागृहामध्ये प्रवेश केला आणि अतिशय धैर्याने परमेश्वराच्या राज्याविषयी संवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने चर्चा करीत राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 19:8
17 Iomraidhean Croise  

मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.


नंतर ते पिर्गा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंत्युखियास पोहचले; आणि शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले.


तेव्हा पौल व बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगण्याचे अगत्य होते; तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्या अर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो.


मग इकुन्यात असे झाले की, यहूदी लोकांच्या सभास्थानात ते दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की, यहूदी व हेल्लेणी ह्यांच्या मोठ्या लोकसमुदायाने विश्वास ठेवला.


ह्यामुळे तो सभास्थानात यहूद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालत असे.


मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यांना तेथे सोडले; आणि स्वत: सभास्थानात जाऊन यहूद्यांबरोबर वादविवाद केला.


तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला व अक्‍विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.


तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खातरी करून देत असे.


असे दोन वर्षे चालल्यामुळे आशियात राहणार्‍या सर्व यहूदी व हेल्लेणी लोकांनी प्रभू येशूचे वचन ऐकले.


ते सगळे सुमारे बारा पुरुष होते.


मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करू लागले, तेव्हा त्याने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले, आणि तुरन्नाच्या पाठशाळेत तो दररोज वादविवाद करू लागला.


म्हणून मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही ही आठवण ठेवून सावध राहा.


तेव्हा त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिर्‍हाडी आले; त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करत होता.


प्रियजनहो, आपल्या समाईक तारणाविषयी तुम्हांला लिहायची मला मोठी ओढ लागली होती, तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हांला लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan