Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 19:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 ह्या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 याकाळामध्ये ‘त्या मार्गाविषयी’ मोठा गोंधळ उडाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 ह्या सुमारास प्रभूच्या मार्गाविषयी इफिस येथे बराच तणाव निर्माण झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 त्याच सुमारास, या मार्गाविषयी फार मोठी खळबळ उडाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 19:23
10 Iomraidhean Croise  

तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला व अक्‍विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.


मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करू लागले, तेव्हा त्याने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले, आणि तुरन्नाच्या पाठशाळेत तो दररोज वादविवाद करू लागला.


पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देईपर्यंत मी ह्या पंथाचा पाठलाग केला.


तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करतो;


फेलिक्साला त्या मार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसिया सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.”


त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे.


मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे;


फटके खाण्यात, बंदिवासांत, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टांत, जागरणांत, उपवासांत;


अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध; ‘मरणोन्मुख’ असे मानलेले तरी पाहा, ‘आम्ही जिवंत आहोत;’ ‘शिक्षा भोगणारे’ असे मानलेले ‘तरी जिवे मारलेले नाही;’


Lean sinn:

Sanasan


Sanasan