Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 19:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मग आपली सेवा करणार्‍यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 त्याची सेवा करणाऱ्यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियात पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्याने आपले दोन मदतनीस, तीमथ्य व एरास्तला मासेदोनियास पुढे पाठविले आणि तो आणखी काही काळ आशिया प्रांतात राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 19:22
18 Iomraidhean Croise  

मग ते सलमीनात असता त्यांनी यहूद्यांच्या सभास्थानामध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली; आणि योहान हाही त्यांचा सहायक होता.


मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणार्‍या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता; पण त्याचा बाप हेल्लेणी होता.


त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती; तेव्हा त्या ठिकाणी जे यहूदी होते त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्याची सुंता केली; कारण त्याचा बाप हेल्लेणी आहे हे सर्वांना ठाऊक होते.


सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा पौल आत्म्याने प्रेरित होऊन ‘येशू हाच ख्रिस्त आहे,’ अशी यहूद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात गढून गेला होता.


असे दोन वर्षे चालल्यामुळे आशियात राहणार्‍या सर्व यहूदी व हेल्लेणी लोकांनी प्रभू येशूचे वचन ऐकले.


हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्‍चय करून म्हटले, “तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.”


इतक्यात नगरात गोंधळ उडाला; आणि पौलाचे वाटेतले सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढत ओढत ते एकजुटीने नाटकगृहात धावत गेले.


नंतर गलबला निवाल्यावर पौलाने शिष्यांना बोलावून त्यांना बोध केला, व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्यास निघाला.


माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरता ह्याच हातांनी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात.


माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस ह्याचा तुम्हांला सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्‍वर्त ह्यांचा तुम्हांला सलाम.


तुमच्याकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुमच्याकडे यावे, आणि तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे, असा माझा बेत होता.


आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही; कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली; आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपेनही.


तेव्हा माझा बंधू तीत हा मला भेटला नाही, म्हणून माझ्या जिवाला चैन पडेना. मग तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियात निघून गेलो.


बंधूंनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवतो;


इतकेच केवळ नाही तर प्रभूचा गौरव व्हावा व आमची उत्सुकता दृष्टोत्पत्तीस यावी म्हणून आम्ही करत असलेल्या ह्या कृपेच्या कार्यात आम्हांला प्रवासात सोबत करण्यासाठी मंडळ्यांनी त्याला नेमले.


मासेदोनिया व अखया ह्यांत तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे; ह्यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगायचे अगत्य नाही.


एरास्त करिंथात राहिला; त्रफिम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan