Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 19:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 जादूटोणा करणार्‍यांपैकी बर्‍याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली; आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्नास हजार रुपये झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 काही विश्वास ठेवणाऱ्यांनी जादूची कामे केली होती, या विश्वास ठेवणाऱ्यांनी आपली सर्व जादूची पुस्तके लोकांसमोर आणली आणि जाळली, त्या पुस्तकांची किंमत पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत ती जाळून टाकली आणि त्यांच्या किंमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 अनेक लोक जे जादूटोणा करीत होते, त्यांनी त्यांची पुस्तके एकत्रित आणली आणि ती सर्व लोकांसमोर जाळून टाकली. त्यांनी त्या पुस्तकांची किंमत मोजली, तेव्हा ती पन्नास हजार चांदीची नाणी एवढी झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 19:19
23 Iomraidhean Croise  

तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व परके देव आणि त्यांच्या कानांत असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली; आणि याकोबाने शखेमाजवळ असलेल्या एला वृक्षाखाली ती पुरून टाकली.


शौलाने परमेश्वराचा अपराध केला, परमेश्वराचा शब्द मानला नाही आणि परमेश्वराला प्रश्‍न करण्याऐवजी भूतविद्याप्रवीण स्त्रीचा त्याने सल्ला घेतला,


त्याने आपली मुले हिन्नोमपुत्रांच्या खोर्‍यात अग्नीत होम करून अर्पण केली; तो शकुनमुहूर्त मानत असे; जादूटोणा व मंत्रतंत्र करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.


तसेच त्यांनी बनवलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकले व कुटून त्याचा चुरा केला; तो त्याने पाण्यावर टाकला. ते पाणी त्याने इस्राएल लोकांना प्यायला लावले.


मग फारोनेही जाणते व मांत्रिक बोलावले; मिसराच्या त्या जादुगारांनीसुद्धा आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला.


तेव्हा मिसराच्या जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन ह्यांचे म्हणणे ऐकेना.


तुमच्या रुपेरी कोरीव मूर्तींची मढवणी व तुमच्या सोनेरी ओतीव मूर्तींचा मुलामा तुम्ही अपवित्र लेखाल, एखाद्या अमंगळ वस्तूप्रमाणे त्या तुम्ही दूर फेकून द्याल; “चालती हो,” असे तुम्ही मूर्तीस म्हणाल.


ते तुम्हांला म्हणतील, “भूतवैद्यांना व छांछू करणार्‍या मांत्रिकांना विचारायला जा;” तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? जिवंतांसाठी मेलेल्यांना विचारावे काय?


तेव्हा राजाने हुकूम केला की, ‘माझी स्वप्ने काय आहेत ते सांगायला ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार व खास्दी ह्यांना बोलावून आणा.’ मग ते सर्व राजासमोर हजर झाले.


ते वस्त्र लोकरीचे असो अथवा सणाचे असो, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यांवर, तसेच चामड्यावर किंवा चामड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला, तर ती वस्तू जाळावी; ते पसरत जाणारे कुष्ठ असल्यामुळे ती वस्तू अग्नीत जाळून टाकली पाहिजे.


म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.


तसेच अशी कोण स्त्री आहे की, तिच्याजवळ रुप्याची दहा नाणी असता त्यांतून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही?


पुढे ते सबंध बेटातून चालून पफेस गेल्यावर बर्येशू नावाचा कोणीएक यहूदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला.


परंतु अलीम जादूगार (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) ह्याने त्यांना अडवून सुभेदाराला विश्वासापासून फितवण्याचा प्रयत्न केला.


विश्वास ठेवणार्‍या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली.


कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि [स्वर्गात]आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan