Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 18:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तर त्यांचा निरोप घेताना, “देवाची इच्छा असल्यास [येणार्‍या सणात यरुशलेमेत] मी तुमच्याकडे पुन्हा येईन” असे म्हणून तो तारवात बसून इफिसाहून निघाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 उलट त्यांचा निरोप घेताना, “देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे मी पुन्हा येईन”, असे सांगून तो तारवात बसून इफिस येथून निघाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 परंतु निघताना मात्र त्याने त्यांना वचन दिले, “परमेश्वराची इच्छा असेल, तर मी पुन्हा येईन.” मग इफिस सोडून जलमार्गाने तो निघाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 18:21
28 Iomraidhean Croise  

मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली : “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”


मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला.


त्यावर आणखी एकाने म्हटले, “प्रभूजी, मी आपल्यामागे येईन; परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या.”


त्या म्हणजे मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावीत; ह्यांपासून स्वत:ला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो.”


मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यांना तेथे सोडले; आणि स्वत: सभास्थानात जाऊन यहूद्यांबरोबर वादविवाद केला.


नंतर त्याने आणखी काही दिवस राहावे अशी ते विनंती करत असताही तो कबूल झाला नाही;


तेव्हा अपुल्लो नावाचा एक मोठा वक्ता व शास्त्रपारंगत आलेक्सांद्रियाकर यहूदी इफिसास आला.


मग असे झाले की, अपुल्लो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहचला; तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले.


मग इफिसात राहणारे यहूदी व हेल्लेणी ह्या सर्वांना हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला.


हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्‍चय करून म्हटले, “तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.”


आपल्याला आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस बाजूला टाकून जाण्याचा पौलाने निश्‍चय केला होता; कारण कसेही करून पन्नासाव्या दिवसाच्या सणात1 आपण यरुशलेमेत असावे ह्यासाठी तो घाई करत होता.


तो ऐकत नाही हे पाहून “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो,” असे म्हणून आम्ही स्वस्थ राहिलो.


त्यांनी इफिसकर त्रफिम ह्याला पूर्वी त्याच्याबरोबर शहरात पाहिले होते; त्याला पौलाने मंदिरात आणले असावे, अशी त्यांची कल्पना होती.


ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करतो.


अशी की, मी देवाच्या इच्छेने तुमच्याकडे आनंदाने येऊन तुमच्याबरोबर विश्रांती घ्यावी.


मनुष्यस्वभावाप्रमाणे म्हणायचे तर इफिसात मी श्वापदांबरोबर लढाई केली ह्यात मला काय लाभ? मेलेले उठवले जात नाहीत, “तर चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या मरायचे आहे.”


कारण आता तुम्हांला केवळ भेटून जावे अशी माझी इच्छा नाही; तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही वेळ तुमच्याजवळ राहीन अशी आशा मी बाळगून आहे.


तरी पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिस येथे राहीन;


तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुमच्याकडे लवकरच येईन; तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन.


बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो; तुम्हांला पूर्णता लाभो; समाधान मिळो; तुम्ही एकचित्त व्हा; शांतीने राहा म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील.


इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे ह्यांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून :


अबीब महिना पाळून आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण कर, कारण अबीब महिन्यातच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून रात्रीच्या वेळी बाहेर आणले.


देव होऊ देईल तर हे आपण करू.


असे न म्हणता, “प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू,” असे म्हणा.


कारण चांगले करूनही तुम्ही दु:ख सोसावे अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करून दु:ख सोसण्यापेक्षा ते बरे आहे.


ती म्हणाली, “[मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे;] तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते [आशियातील] इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया येथील सात मंडळ्यांकडे पाठव.”


इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही : जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो,


Lean sinn:

Sanasan


Sanasan