Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 17:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांनी हेव्याने आपणांबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 परंतु यहूद्यांनी हेव्याने आपणाबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरांत घबराट निर्माण केली आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोंकाकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 परंतु यहुदी लोकांनी हेव्याने आपल्याबरोबर बाजारातले काही लोक घेऊन व घोळका जमवून शहरभर भय निर्माण केले. यासोन नावाच्या गृहस्थाच्या घरावर ह्रा करून पौल व सीला ह्यांना बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 परंतु इतर यहूदीयांना मत्सर वाटला; म्हणून त्यांनी रस्त्यावरील काही गुंड लोकांना घेऊन शहरात त्यांना दंगल करण्यास चिथावणी दिली. पौल व सीला यांना बाहेर काढून लोकांकडे आणण्यासाठी ते त्यांना शोधीत यासोनाच्या घराकडे धावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 17:5
26 Iomraidhean Croise  

मी लंगडलो तेव्हा त्यांना आनंद झाला; ते एकत्र जमले, ते अधम मला नकळत माझ्याविरुद्ध एकत्र जमले; त्यांनी माझी निंदा एकसारखी चालवली.


वेशीत बसणारे माझ्याविषयी बोलत असतात, मी मद्यपी लोकांच्या गीतांचा विषय झालो.


शांत अंत:करण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते.


पण लोकसमुदायांना पाहून यहूदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले.


नंतर अंत्युखिया व इकुन्या येथून कित्येक यहूदी आले; त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले.


परंतु विरोधी यहूद्यांनी परराष्ट्रीयांचे मन बंधुजनांविरुद्ध चेतवून कलुषित केले.


तरीपण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकातल्या यहूद्यांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळवून चेतवले.


परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकार्‍यांकडे ओढत नेऊन आरडाओरड करत म्हटले, “ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत;


त्यांना यासोनाने आपल्या घरात घेतले आहे, आणि हे सर्व जण कैसराच्या हुकमांविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात.”


मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.


नंतर गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असता, यहूद्यांनी एकोपा करून पौलावर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले,


ह्या दंगलीचे कारण काय ह्याचा जबाब आपल्याला देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपल्यावर बंड केल्याचा आरोप येण्याचे भय आहे.”


नंतर कुलपतींनी ‘हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले’; पण ‘देव त्याच्याबरोबर होता’,


माझा सहकारी तीमथ्य व माझे नातेवाईक लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.


कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात; ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही? व मानवी रीतीने चालता की नाही?


मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे;


हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणार्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.


तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात;


“जो आत्मा आपल्या ठायी वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते” हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हांला वाटते काय?


त्यांनी अबीमलेखाला बआल-बरीथच्या घरातून सत्तर रुपये दिले; ह्या पैशांनी त्याने रिकामटेकड्या व बेदरकार लोकांना पदरी ठेवले व ते त्याच्याबरोबर चालायला लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan