Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 17:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खातरी होऊन ते पौल व सीला ह्यांना येऊन मिळाले; आणि भक्तिमान हेल्लेणी ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्याथोडक्या नव्हत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा त्याच्यापैकी काही जणांची खातरी होऊन पौल सीला ह्यांना येऊन मिळाले; आणि ग्रीक उपासक ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला, त्यामध्ये प्रमुख स्त्रिया काही थोड्या थोडक्या नव्हत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खातरी होऊन ते पौल व सीला ह्यांना येऊन मिळाले. तसेच ग्रीक लोकांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यांत प्रमुख स्त्रिया काही थोड्याथोडक्या नव्हत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ऐकणार्‍यांपैकी काही यहूदीयांची खात्री झाली आणि ती माणसे पौल व सीला यांना येऊन मिळाली. यामध्ये परमेश्वराचे भय धरणार्‍या ग्रीक लोकांची संख्या मोठी होती आणि त्यात काही प्रमुख स्त्रियाही समाविष्ट होत्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 17:4
31 Iomraidhean Croise  

सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.


भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा; आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला.”


स्त्रियांतल्या परम सुंदरी, तुझा वल्लभ कोठे गेला? तुझा वल्लभ कोणीकडे निघून गेला ते सांग, म्हणजे त्याला शोधायला आम्ही तुझ्याबरोबर येऊ.


त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायी वस्ती करीन, मग तुला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.


ह्यामुळे यहूदी आपसांत म्हणाले, “हा असा कोठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही? तो हेल्लेणी लोकांत पांगलेल्यांकडे जाणार आणि हेल्लेण्यांस शिकवणार काय?


आणि सभा उठल्यावर, यहूद्यांतील व भक्तिमान यहूदीयमतानुसारी ह्यांच्यातील पुष्कळ जण पौल व बर्णबा ह्यांच्यामागे गेले; त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळवले.


तेव्हा यहूदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले.


मग इकुन्यात असे झाले की, यहूदी लोकांच्या सभास्थानात ते दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की, यहूदी व हेल्लेणी ह्यांच्या मोठ्या लोकसमुदायाने विश्वास ठेवला.


तेव्हा नगरातील लोकसमुदायात फूट पडली; कित्येकांनी यहूद्यांची बाजू धरली तर कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली.


तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणांतून निवडलेली माणसे, म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बसर्र्ब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले;


ह्याकरता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे; ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील.


यहूदा व सीला हे स्वत: संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.


पण पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर सोपवल्यावर तो तेथून निघाला.


त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती; तेव्हा त्या ठिकाणी जे यहूदी होते त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्याची सुंता केली; कारण त्याचा बाप हेल्लेणी आहे हे सर्वांना ठाऊक होते.


नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानात गेले.


त्यांतील अनेकांनी व बर्‍याच प्रतिष्ठित हेल्लेणी स्त्रिया व पुरुष ह्यांनी विश्वास ठेवला.


त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लगेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले.


ह्यामुळे तो सभास्थानात यहूद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालत असे.


तरी काही माणसांनी त्याला चिकटून राहून विश्वास ठेवला; त्यांत दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.


तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खातरी करून देत असे.


असे दोन वर्षे चालल्यामुळे आशियात राहणार्‍या सर्व यहूदी व हेल्लेणी लोकांनी प्रभू येशूचे वचन ऐकले.


तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही समाईक होते.


आरोळी मारून म्हटले, “अहो इस्राएल लोकांनो, धावा हो धावा; आपले लोक, नियमशास्त्र व हे स्थळ ह्यांच्याविरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवतो तोच हा आहे; शिवाय ह्याने हेल्लेण्यांस मंदिरात आणून हे पवित्रस्थान विटाळवले आहे.”


त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर कित्येक विश्वास ठेवीनात.


ते सुटल्यानंतर आपल्या मित्रमंडळीकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडील जे काही त्यांना म्हणाले होते ते सर्व त्यांनी सांगितले.


आम्हांला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणांस आम्हांलाही दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan