Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 17:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 पौल अथेनै येथे सीला व तीमथ्य यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे, असे पाहून तो मनात खवळला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्यावेळी पौल ॲथेन्समध्ये त्यांची वाट पाहत असताना, ते शहर मूर्तींनी भरलेले पाहून तो आत्म्यामध्ये फार दुःखी झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 17:16
20 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे; कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले; मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”


तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले, मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”


लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात.


विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळत नाहीत.


कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, निंदा करणार्‍यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे.


मी म्हणालो, “मी त्याचे नाव काढणार नाही, ह्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.


मी तर याकोबाला त्याचा अपराध आणि इस्राएलास त्याचे पाप दाखवण्यास खरोखर परमेश्वराच्या आत्म्याने, सामर्थ्याने, न्यायाने व बळाने पूर्ण आहे.


मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.


मग यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू वर यरुशलेमेस गेला.


तेव्हा पौलाला पोहचवणार्‍यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले, आणि सीला व तीमथ्य ह्यांनी आपल्याकडे होईल तितक्या लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेऊन ते निघाले.


(काहीतरी नवलविशेष सांगितल्या किंवा ऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे.)


कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, ‘अज्ञात देवाला’ ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हांला जाहीर करतो.


त्यानंतर तो अथेनै सोडून करिंथास गेला.


पण आता पाहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमेस जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही;


आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनैतच एकटे मागे राहावे, हे आम्हांला बरे वाटले.


आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan