Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 17:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्यांतील अनेकांनी व बर्‍याच प्रतिष्ठित हेल्लेणी स्त्रिया व पुरुष ह्यांनी विश्वास ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्यातील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रिया व पुरूष ह्यांनी विश्वास ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 ह्यावरून त्यांतील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रीपुरुषांनी विश्वास ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 याचा परिणाम असा झाला की अनेकांनी विश्वास ठेवला, यामध्ये बर्‍याच संख्येने प्रमुख ग्रीक स्त्रिया व अनेक ग्रीक पुरुष देखील होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 17:12
13 Iomraidhean Croise  

म्हणून अरिमथाईकर योसेफाने हिंमत धरून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले; हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता.


जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल.


तेव्हा पौल व बर्णबा हे निर्भीडपणे म्हणाले, “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगण्याचे अगत्य होते; तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणांला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्या अर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो.


तेव्हा यहूदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले.


मग इकुन्यात असे झाले की, यहूदी लोकांच्या सभास्थानात ते दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की, यहूदी व हेल्लेणी ह्यांच्या मोठ्या लोकसमुदायाने विश्वास ठेवला.


सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे.


तर बंधुजनहो, तुम्हांला झालेले पाचारणच घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत;


म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2


आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा; कारण तो ‘गवताच्या फुलासारखा’ नाहीसा होईल.


म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवांचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan