Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 16:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेचे नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 पुष्कळ मारहाण केल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकून त्यांनी तुरुंगाधिकाऱ्याला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 त्यांना निष्ठुरपणे पुष्कळ फटके मारल्यानंतर तुरुंगात टाकण्यात आले आणि तुरुंगाच्या पहारेकर्‍याला त्यांच्यावर बंदोबस्ताने पहारा ठेवण्याचा हुकूम देण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 16:23
21 Iomraidhean Croise  

त्याला धरून देणार्‍याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा.”


परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील; तुम्हांला सभास्थाने व तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील, आणि राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे माझ्या नावासाठी नेतील.


मग दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले ह्याविषयी शिपायांत मोठी खळबळ उडाली.


त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता.


तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले; आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता.


तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की, “तुम्हांला सोडावे म्हणून अधिकार्‍यांनी माणसे पाठवली आहेत; तर आता शांतीने जा.”


आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले.


“बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि बाहेर दरवाजांपुढे पहारेकरी उभे राहिलेले आम्हांला आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हांला आत कोणी सापडले नाही.”


इकडे शौल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकत असे.


त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे.


ते अब्राहामाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (हे मी वेडगळासारखे बोलतो); श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे.


फटके खाण्यात, बंदिवासांत, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टांत, जागरणांत, उपवासांत;


ह्या कारणास्तव मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे.


म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला;


ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणार्‍यासारखा बेड्यांचेदेखील दुःख सोसत आहे; तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही.


तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान,


त्याप्रमाणे यहोशवाने याजकांना यार्देनेतून वर निघून येण्याची आज्ञा केली.


मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर ह्यांचा तुमच्याबरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्यांकरता पात्म नावाच्या बेटात होतो.


तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, ‘तुमची परीक्षा व्हावी’ म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे; आणि तुमचे ‘दहा दिवस’ हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan