Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 16:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तेव्हा लोक त्यांच्यावर उठले; आणि अधिकार्‍यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 तेव्हा लोक त्यांच्यावर खवळले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना चाबकाने मारण्याचा आदेश दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मग पौल व सीलावर हल्ला करण्यात लोकसमूह सामील झाला, तेव्हा न्यायाधीशांनी त्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारण्याचा हुकूम दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 16:22
15 Iomraidhean Croise  

माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील,


तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले, व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले.


जेव्हा तुम्हांला सभा, सरकार व अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्यांविषयी काळजी करू नका;


परंतु पौल त्यांना म्हणाला, “आम्ही रोमी माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हांला उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हांला गुप्तपणे घालवतात काय? हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हांला बाहेर काढावे.”


परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांनी हेव्याने आपणांबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली.


नंतर गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असता, यहूद्यांनी एकोपा करून पौलावर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले,


तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले; त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि ‘येशूच्या नावाने बोलू नका’ अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले.


फटके खाण्यात, बंदिवासांत, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टांत, जागरणांत, उपवासांत;


परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दु:ख भोगून व उपमर्द सोसून, (हे तुम्हांला माहीतच आहे,) मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले.


आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला.


‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan