Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 16:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणार्‍या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता; पण त्याचा बाप हेल्लेणी होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग तो दर्बे व लुस्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता, त्याचा पिता हेल्लेणी होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 पौल दर्बे व लुस्त्र येथे आला. तेथे तीमथ्य नावाचा एक शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. मात्र त्याचे वडील ग्रीक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पौल दर्बे आणि नंतर लुस्त्र येथे आला, तिथे तीमथ्य नावाचा एक शिष्य राहत होता, त्याची आई यहूदी असून विश्वासणारी होती, परंतु त्याचे वडील ग्रीक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 16:1
29 Iomraidhean Croise  

त्यांनी आपणांस व आपल्या पुत्रांस त्यांच्या कन्या केल्या आहेत; पवित्र बीज देशोदेशीच्या लोकांत मिसळून गेले आहे; सरदार व शास्ते ह्यांचा हात ह्या पातकात प्रमुख आहे.”


मग इकुन्यात असे झाले की, यहूदी लोकांच्या सभास्थानात ते दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की, यहूदी व हेल्लेणी ह्यांच्या मोठ्या लोकसमुदायाने विश्वास ठेवला.


त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया ह्या नगरांत ते परत आले;


हे ओळखून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र व दर्बे ह्या नगरांत व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले;


त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लगेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले.


सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा पौल आत्म्याने प्रेरित होऊन ‘येशू हाच ख्रिस्त आहे,’ अशी यहूद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात गढून गेला होता.


मग आपली सेवा करणार्‍यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला.


माझा सहकारी तीमथ्य व माझे नातेवाईक लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.


तीमथ्य आल्यास त्याने तुमच्याजवळ निर्भयपणाने राहावे म्हणून खबरदारी घ्या; कारण माझ्याप्रमाणे तोही प्रभूचे कार्य करत आहे.


ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हांला देईल.


कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे; असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती; परंतु आता ती पवित्र आहेत.


करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून :


कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आमच्याकडून म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुमच्यामध्ये झाली ती होय, नाही, अशी नव्हती, तर त्याच्या ठायी होय अशीच होती.


फिलिप्पै येथील सर्व अध्यक्ष1 व सर्व सेवक2 ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणार्‍या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तीमथ्य ह्यांच्याकडून :


तुमच्यासंबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तीमथ्याला मी तुमच्याकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे.


कलस्सै येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणार्‍या बंधूंना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून :


देवपित्याच्या ठायी व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलनीकाकरांची मंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून : देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.


आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा;


आता तीमथ्याने तुमच्यापासून आमच्याकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जसे आम्ही तुम्हांला भेटण्यास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हांला भेटण्यास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता ह्यांविषयीचे सुवर्तमान आम्हांला कळवले;


देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून :


माझ्या मुला तीमथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की, तू त्यांच्या द्वारेच सुयुद्ध कर;


देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया व शांती असो.


देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया व शांती असो.


तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठायी होता; तुझी आई युनीके हिच्या ठायी होता; आणि तोच तुझ्याही ठायी आहे असा मला भरवसा आहे.


मला अंत्युखियात, इकुन्यात व लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस; त्या सर्वांतून प्रभूने मला सोडवले.


आमचा प्रिय सहकारी फिलेमोन ह्याला : तुला, आमची बहीण अफ्फिया हिला, आमचा सहसैनिक अर्खिप्प ह्याला, व तुझ्या घरात जमणार्‍या मंडळीला;


आपला बंधू तीमथ्य ह्याची सुटका झाली आहे हे तुम्हांला कळावे; तो लवकर आला तर त्याच्याबरोबर मी तुमच्या भेटीस येईन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan